*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अवैध रीतीने गुटखा वाहतूक करणारे वाहन पकडून पोलिसांनी वाहनांसह २४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.वाहन चालकास ही अटक केली आहे.
शुक्रवारी पहाटे पोलीस ठाणे हददीत एक पांढरे रंगाचे महिंद्रा पिकअप वाहन नं.एम एच ४५ ए एफ २३०७ हे प्रतिबंधीत गुटखा वाहतुक करताला मिळून आल्याने ते ताब्यात घेऊन सादरवे वाहन चालकास अटक केली.
या वाहनांमध्ये विमल पान मसाला ४५ खाकी रंगाच्या बॅगा त्यामध्ये ९ हजार ३६० पाऊच, तसेच त्याचा व्हि वन तंबाखु ९ हजार ३६० पाऊच, विमल पान मसाला मोठा ०५ खाकी बॅगा त्यामध्ये १ हजार १०० पाऊच तसेच त्याचा व्हि वन तंबाखु १ हजार १०० पाऊच व आर एम डी पान मसाला ०४ मोठे बॉक्स त्यामध्ये १६० पुडे तसेच मिश्रण करणारा एम सेंटेड तंबाखु १६० पुडे असा गुटखा मिळून आला,पोलिसांनी या मालासह महिंद्रा पिकअप वाहन मिळून एकुण २३ लाख ८६ हजार किमतीचा माल जप्त केला आहे. वाहनाचा चालक सुनिल बळी चंदनशिवे रा. एकतपुर रोड, लिंगे वस्ती शेजारी सांगोला यांचेविरूध्द मंगेश मल्हारी लवटे सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन म. राज्य सोलापुर यांनी फिर्याद दिल्याने पोलिसांनी अन्न सुरक्षा व मानके कायदयातील तरतुदी नुसार गुन्हा दाखल केला आहे.
अकलुज विभागाचे पोलिस उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर व पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे,पोहेकॉ बकाल, व पोहेकों पठाण हे पुढील तपास करीत आहेत.
अकलूज पोलिसांची ही कारवाई कौतुकास्पद आहे मात्र अकलूज मध्ये प्रतिबंधित असलेला गुटखा सर्रास पान टपऱ्यांवर विक्री करताना पाहावयास मिळत आहे कोणत्याही पान टपरी समोर पाहिले तर त्यांच्या रिकामे पाऊचचा सडा पडलेला निदर्शनास येईल मात्र त्याकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष नसल्याने नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा होत आहे?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा