Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २२ नोव्हेंबर, २०२४

*गाईच्या पोटातून काढले तब्बल 26 किलो "प्लास्टिक"!*

 


*अकलूज --प्रतिनिधी*

*केदार---- लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

अकलूज-संग्रामनगर अकलूज येथील गो शाळेमध्ये एका आजारी वासराच्या पोटातून ऑपरेशन करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढण्यात आले आहे.



            संतोष जाधव हे गत 10 वर्षांपासून स्वखर्चाने गो सेवा व गो रक्षण करत आहेत.आज तागायत त्यांनी अनेक आजारी, अपघात झालेल्या,शेतकऱ्यांनी एसिड टाकून जखमी केलेल्या गाई,घोडे व इतर जनावरे स्वखर्चाने उपचार करून त्यांना नवजीवन दिले आहे.नुकतेच एक आजारी असलेले देशी गाईचे वासरू त्यांच्या गो शाळेत आणले गेले.या वासराचे पोट भले मोठे फुगले होते.संतोष जाधव यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ.वाघमोडे यांना बोलावले असता त्यांनी ऑपरेशन करून या वासराच्या पोटातून तब्बल 26 किलो प्लास्टिक बाहेर काढले.

         संतोष जाधव यांच्या या गो सेवेबद्दल संपूर्ण अकलूज व परिसरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.परिसरातील दानशूर नागरिकांनी गो शाळेला सढळ हाताने मदत करावी असे आवाहन यावेळी संतोष जाधव यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा