उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स ४५ न्यूज मराठी
शेर -ए हिंद टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त गणेशगांव येथील टिपू सुलतान चौकात हिंदू-मुस्लिम बांधवानी एकत्र येऊन रक्तदान शिबीराचे आयोजन केले.या शिबीरात २७ग्रामस्थांनी रक्तदान करून पवित्र कार्य केले आहे.
माळशिरस तालुक्यातील पुर्व भागातील गणेशगांव येथे टिपू सुलतान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.त्यानिमित्त सर्व ग्रामस्थांना रविवारी मोठ्या प्रमाणात अन्नदान ही करण्यात येणार आहे.त्यादिवशी हिंदू असो किंवा मुस्लिम सर्वजण एकत्र येऊन जेवणाच्या पंगतीचा आस्वाद घेणार आहेत त्यानंतर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.या गावात प्रत्येक महापुरुषांची जयंती असो किंवा पुण्यतिथी असो कोणताही धर्मभेद किंवा जातीभेद न मानता गावातील सर्व धर्मीय एकत्र येऊन महामानवांचे जयंती व पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरा करतात.गणेशगांव येथील ग्रामस्थ नेहमीच राष्ट्रीय एकात्मता व सर्व धर्म समभाव कृतीतून जपतात .
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी चे अल्पसंख्यांक तालुका उपाध्यक्ष
नशीरभाई शेख,तंटा मुक्ती अध्यक्ष गणपत वाघ ,सरपंच सदाशिव शेंडगे मा.सरपंच रहीम शेख मा.सरपंच शरफुद्दीन कोरबू ,मा.उपसरपंच महादेव मोरे व टिपू सुलतान ग्रुपचे अध्यक्ष समीर कोरबू उपाध्यक्ष अमीर शेख गीताई विकास सेवा संस्था चे मा.चे. सीताराम शेंडगे ,डॉ.सोलनकर ,कुंडलिक शेंडगे अमोल देशमुख यांचे विशेष सहकार्य लाभले .
*चौकट*
या रक्तदान शिबीरात गणेशगांव सरपंच सदाशिव शेंडगे इर्शाद शेख,बाळासाहेब पानसरे,बंडु कोळेकर,सलमान शेख,सोहेल पठाण,सत्तार शेख,तनवीर शेख,तनवीर नसृद्दीन शेख,सागर मोरे, आशादउल्ला कोरबू,मंगेश यादव,सौरभ गोळे,अमीर शेख,ऋषिकेश गवळी,ओंकार पाटील,ताहेर कोरबू,अभिषेक गवळी,रियाज शेख,इन्नुस कोरबू,इर्शाद शेख,दशरथ मोरे-पाटील, वाहीदअली शेख, भाईसाब शेख,ताहेर कोरबू ,दाउद शेख, फक्रुद्दीन शेख यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा