Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०२४

ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, राष्ट्र सेवा दलाचे पूर्णवेळ कार्यकर्ता, पुरोगामी चळवळीतील अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेले इंदापूर येथील साथी सलीम शेख यांचे हृदय विकाराच्या तीव्र धक्‌याने निधन

 


*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी 

टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:--  8378081147*

-----ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, राष्ट्र सेवा दलाचे पूर्णवेळ कार्यकर्ता, पुरोगामी चळवळीतील अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेले इंदापूर येथील साथी सलीम अब्दुल लतीफ शेख (वय ६२) यांचे हृदय विकाराच्या तीव्र धक्‌याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

पट्टीचा वक्ता असलेल्या साथी सलीम शेख सन १९८० च्या दशकापासून आजपर्यंत राष्ट्र सेवा दलाचा निष्ठावंत, जेष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते.

     डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे सहकारी तथा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रयोग केले, व्याख्याने दिली. इंदापूर तालुक्यातील रुई येथील बाबीर देवाच्या जत्रेत पशू बळी देवू नयेत यासाठी त्यांनी अनेक वर्ष प्रबोधन केले. बाभुळगाव येथे अचानक घरे पेटू लागल्याने यामागचे विज्ञान स्पष्ट करून त्यांनी इंदापूर पोलीस ठाणे व इंदापूर तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून हा प्रकार थांबवला.

    राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी पुढाकार घेऊन उभारलेल्या सामाजिक कृतज्ञता निधीचा लाभ मिळणारा इंदापूर तालुक्यातील एकमेव कार्यकर्ता म्हणजे साथी सलीम शेख होय. डॉ. लागू व निळू फुले यांच्या पुढाकाराने त्यांचा आंतरजातीय विवाह झाला. १९८६ पासून शाहिर अमरशेख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आपल्या भीमा निरा विकास संस्थेच्या माध्यमातून त्यांनी राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धांचे दरवर्षी आयोजन केले. राष्ट्रशाहीर अमर शेख यांच्या नावाने विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणा-या व्यक्तींचा ते दरवर्षी सन्मान करत असत. इंदापूर मध्ये राष्ट्र शाहीर अमर शेख यांचे स्मारक व्हावे यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले. इंदापूर मध्ये त्यांनी साहित्य कला मंच ची स्थापना करून त्यांनी अनेक सामाजिक विषय हाताळत युवा पिढीच्या अंगातील सुप्त कला गुणांना वाव दिला. स्वर्गीय केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे ते जवळचे स्नेही होते तर राष्ट्र सेवा दलाचे जेष्ठ नेते पन्नालाल सुराणा, बाबा आढाव यांच्या समवेत त्यांनी अनेक आंदोलनात भाग घेतला होता. भटक्या, विमुक्त जाती जमातींना मुख्य विकास प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले. इंदापूर शहरातील शाहू नगर मध्ये पारधी समाजाला रहाण्यासाठी जागा मिळावी म्हणून त्यांनी प्रयत्न केले. त्याच्या अकाली निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्याच्या सामाजिक कार्यामुळे इंदापूर चे नाव संपूर्ण राज्यात झाले होते. त्यांच्या विश्वभारती प्रकाशनामुळे अनेक नवोदित कवी, लेखक यांना व्यासपीठ मिळाले होते.

    साप्ताहिक नांगरधारी, साप्ताहिक हायवे दर्शन चे संपादक तसेच विविध वृत्तपत्रांमध्ये प्रासंगिक लिखाण त्यांनी केले. त्यांच्या शेवंताची परवड या लेखामुळे आंदोलन उभे राहिले होते.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा