Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०२४

इंदापूर विधानसभा मतदारसंघात मतदान स्लिपा मतदारांना बीएलओ मार्फत घरोघरी वाटप


 

*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी 

टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:--  8378081147*

- -----भारत निवडणूक आयोगाकडून इंदापूर विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदान स्लिपा मतदारांना बीएलओ मार्फत घरोघरी वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे मतदारांना आपले मतदान केंद्र, मतदान यादीतील अनुक्रमांक, मतदान केंद्राचा नकाशा आदी माहितीचा तपशील मिळण्यास मदतीचे होत आहे. मतदान स्लीपांवर स्कॅनरही आहे.                दरम्यान, ज्या युवकांनी नव्याने नाव नोंदविले त्यांची नावे मात्र कुटुंबाच्या मतदान केंद्रात न येता इतर मतदान केंद्रातही आली आहेत. त्यामुळे आई-वडिलांचे मतदान केंद्र एक तर मुलाचे मतदान केंद्र दुसरे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तंत्रज्ञान एवढे पुढे गेले तरीही मतदार यादीतील चुका मात्र कायमच दिसून येत आहे, त्यामुळे मतदारांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

   मयत व्यक्तींची नावे वर्षानुवर्षे यादीत

मतदार यादीमध्ये सुमारे १५ ते २० वर्षांपासून मृत व्यक्तींची नावे कायमच असल्याचे दिसून येत आहे. बीएलओ मार्फत मयत मतदारांची नावे काढण्याचा अर्ज, मृत्यू दाखले अनेकदा देऊनही मयतांची नावे मतदार यादीत वर्षानुवर्षे कायमच राहत असल्याची तक्रार मयतांच्या कुटुंबियांकडून केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात निवडणुक आयोगाने मयतांची नावे काढण्याची खास मोहीम राज्यभर राबवण्याची गरज आहे.

    स्थलांतरित मतदार व लग्न झालेल्या मुलींची नावे मतदार यादीतून कमी करण्याकरिता बिएलओ मार्फत स्थलांतरित करूनही जुन्याच यादीत पुन्हा पुन्हा नावे येत आहेत. लग्न झालेल्या मतदारांचे सासर व माहेरचे लोक बिएलओंना सतत याबाबत तक्रार करत असतात. त्यामुळे सदर बाबत निवडणूक आयोगाने यांचाही राज्यस्तरीय कार्यक्रम घेणे आवश्यक आहे.

फोटो - गणेशवाडी येथील मतदारांना बिएलओ मार्फत मतदान स्लिपचे वाटप करण्यात आले.

---------------------------


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा