Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०२४

*सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील कारखान्याच्या १ लाख ११ हजार १११ साखरपोत्याचे पूजन*

 


*अकलूज --प्रतिनिधी*

*केदार---- लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

शंकरनगर अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२४-२५ च्या गळीत हंगामामध्ये उत्पादित झालेल्या १ लाख १ हजार १११ व्या साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे शुभहस्ते संपन्न झाले.

         कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे कुशल मार्गदर्शनाखाली व चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे.कारखान्याचा सिझन २०२४-२५ चा ऊस गळीत हंगाम दि.१५ नोव्हेंबर रोजी सुरु झाला असून आज अखेर १ लाख २४ हजार ८६० मे.टन ऊसाचे गाळप होऊन १ लाख ०६ हजार क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झालेले असून सरासरी साखर उतारा ९.३५ % व आजचा साखर उतारा ९.४० % आहे. सध्या प्रति दिवस ८५०० मे.टन याप्रमाणे ऊसाचे गाळप होत आहे.चालू सिझन २०२४-२५ मध्ये को-जन वीज निर्मिती प्रकल्प दिनांक ७ नोव्हेंबर रोजी सुरु झाला असून आजअखेर १ कोटी ०९ लाख ४५ हजार ०९० युनीट वीज निर्माण झाली असून त्यामधुन ६६ लाख ४६ हजार २१४ युनिट वीज विक्री केलेली आहे.तसेच उपपदार्थ प्रकल्प डिस्टीलरीमध्ये आज अखेर १८ लाख ९४ हजार २१९ लिटर्स रेक्टीफाईड स्पिरीट तसेच १६ लाख ७८ हजार ४५४ लिटर्स इथेनॉल उत्पादन झाले असलेची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी दिली. 


            साखर पोती पूजनाचे कार्यक्रमास कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख,संचालक लक्ष्मण शिंदे,सतीश शेंडगे,विजयकुमार पवार,रावसाहेब मगर,रामचंद्र सिद,विराज निंबाळकर, रावसाहेब पराडे,महादेव क्षिरसागर,गोविंद पवार,सुभाष कटके,जयदिप एकतपुरे,रामचंद्र ठवरे,तज्ञ संचालक,प्रकाशराव पाटील,रामचंद्रराव सावंत- पाटील,संचालिका सुजाता शिंदे, कार्यलक्षी संचालक-रणजित रणनवरे व शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमेडीया लेजर शो कमिटी संचालक पांडूरंग एकतपुरे,बाळासाहेब माने-देशमुख,राजेंद्र भोसले, धनंजय सावंत,सौ.हर्षाली निंबाळकर तसेच कार्यकारी संचालक-राजेंद्र चौगुले व खातेप्रमुख,कामगार युनियन प्रतिनिधी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.सदर साखर पोती पुजन प्रसंगी कारखान्याचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे स्वागत चिफ् केमिस्ट एस.एन.जाधव व सत्कार चिफ् इंजिनिअर एस.के.गोडसे यांनी केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा