*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
मौजे काक्रंबा ता. तुळजापूर जि. धाराशिव या शिवारात रिन्यू ग्रीन व जेएसडब्ल्यू या कंपनीने पवनचक्की बसविण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाची नाहरकत न घेतल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी तुळजापूर येथील कट्टर शिवसैनिक व सामाजिक कार्यकर्ते
अमोल शिवाजी जाधव, रा. तुळजापूर जि.धाराशिव यांनी धाराशिव जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली असून याबाबत सविस्तर वृत्त अस. काक्रंबा ता. तुळजापूर जि. धाराशिव या शिवारात रिन्यू ग्रीन सोल्यूशन व जेएसडब्ल्यू या दोन्ही कंपन्याने पवनचक्की बसविलेल्या आहेत. तरी सदरील पवनचक्की बसविण्यासाठी शासकीय नियमानुसार ग्रामपंचायत कार्यालय व इतर कार्यालयाची नाहरकत प्रमाणपत्राची आवश्यकता असते. त्यामुळे सदरील दोन्ही कंपन्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या कोणत्याही प्रकारची नाहरकत न घेताच पचनचक्की उभा केलेल्या आहेत, ते पूर्णपणे बेकायदेशीर व चूकीचे आहेत
तरी जिल्हाधिकारी धाराशिव यांनी माझ्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मौजे काक्रंबा ता. तुळजापूर शिवारात उभा असलेल्या पवचनक्कीची चौकशी करावी व चौकशीअंती सदरच्या कंपन्यावर कायदेशीर कारवाई कराव्यात
अमोल शिवाजी जाधव तुळजापूर
. १) मा. गटविकास अधिकारी वर्ग-१, पंचायत समिती तुळजापूर
२) मा. तहसिलदार, तहसिल कार्यालय, तुळजापूर
३) मा.ग्रामसेवक/सरपंच, ग्रामपंचायत कार्यालय काक्रंबा ता. तुळजापूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा