*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
भारत निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने निवडणूक निकालांचे अंदाज (एक्झिट पोल) वर प्रतिबंध घालण्यात आले.दि.१३ नोव्हेंबर सकाळी ७.०० पासून ते दि.२० नोव्हेंबर सायंकाळी ६.३० वा. या कालावधीत प्रसार माध्यमांवर निवडणूक निकालाचे अंदाज (एक्झिट पोल) प्रसारीत करण्यास प्रतिबंधीत केले आहे.भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सदर अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रकाशित करण्यात आली आहे.सदर अधिसूचना आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व प्रसार माध्यमांच्या वृत्तपत्र,विविध चॅनल,दूरदर्शन,आकाशवाणी इत्यादी निदर्शनास आणून, अनुपालन करणेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा