Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०२४

*माळशिरस विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांनी निवडणूक खर्च तपासणी करून घ्यावी ----प्रांताधिकारी*

 


*अकलूज --प्रतिनिधी*

*केदार---- लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

२५४ माळशिरस (अ.जा.) विधानसभा संघातून निवडणूक लढविणा-या सर्व उमेदवारांच्या निवडणूक खर्च लेख्याची तपासणी दि.८ नोव्हेंबर,१२ नोव्हेंबर व १६ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे यावेळी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधीनी तपासणीसाठी उपस्थित रहावे.

          लोक प्रतिनिधी अधिनियम १९५१ मधील कलम ७७ च्या तरतूदीनुसार निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी त्यांच्या निवडणूक खर्चाचे अभिलेख तपासणीसाठी उपलब्ध करून द्यावयाचे आहेत.त्यानुसार उमेदवारांच्या खर्च अभिलेख्यांची प्रथम तपासणी ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:०० ते सायंकाळी ४:०० यावेळेत पंचायत समिती माळशिरस येथे करण्यात येणार आहे.जे उमेदवार खर्चाचे लेखे तपासणीकरिता सादर करणार नाहीत त्यांच्यावर निवडणूक आयोगामार्फत पुढील कारवाई करण्यात येईल.२५४ माळशिरस (अ.जा.) विधानसभा मतदार संघासाठी खर्च निवडणूक निरीक्षक श्री.के.पी.जयेकर यांनी नियुक्ती करण्यात आलेली आहे.असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा