उपसंपादक-- नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्यूज मराठी
आपला भारत देश प्रगती पथावर आहे सर्वत्र विकास होत चालला आहे.शिक्षणाच्या जोरावर सर्व नागरिक स्वतः ला सुशिक्षित समजू लागले आहेत पण खरचं आपला समाज सुशिक्षित झाला आहे का ? असा प्रश्न निर्माण होतो.आज कोर्टात सर्व काम आटपून निवांत बसलो होतो त्यावेळी एक विचार डोक्यात आला की आजकाल कोर्टा मध्ये घटस्फोटाच्या केस वाढत चालल्या आहेत.एक वकिल म्हणून आपल्याला केस मिळतील या गोष्टीने बर वाटत असल तरी एक माणूस म्हणून या गोष्टीची शोकांतिका वाटते की आपण दुसऱ्याच्या घराचे तुकडे करण्यास त्यांना मदत करत आहोत.पण यात वकिलांचे ही काही चूक नसते कोणता ही वकिल कोणाच्या घरी जाऊन त्यांचा काडीमोड करत नाहीत. लोकं स्वतःच घर स्वतःच फोडून घेण्यासाठी कोर्टात येत असतात. नवरा बायको एकमेकांपासून सुटका करून घेण्यासाठी कोर्टाच्या सतत खेट्या घालत असतात काहीही करून काडीमोड झालंच पाहिजे मग काही जरी झालं तरी ते माघार घ्यायला तयार नसतात.लग्न होत असताना एकमेकांच्या सोबत आयुष्य सुखात घालवण्याची दिलेली वचने कोर्टाच्या पायरीवर तोडली जातात.एकमेकांसोबत च्या सुखद आठवणींना पूर्णविराम दिला जातो.लोकांना घटस्फोट का घ्यावा ? कोणत्या कारणासाठी घ्यावा हे देखील समजत नाही निव्वळ अक्कल शून्य असल्यासारखी लोकं वागतात.ज्या करणाना आडबुड नाही अश्या फालतू कारणांसाठी लोक कोर्टात घटस्फोट घेण्यासाठी येतात.ज्यावेळी लग्न होत त्यावेळी फक्त दोन व्यक्ती च एकत्र येतात असे नव्हे तर दोन कुटुंब ही एकत्र येत असतात. परंतु ज्यावेळी दोन व्यक्तींचा घटस्फोट होतो त्यावेळी दोन कुटुंब विभक्त होत असतात हे लोकांना समजतच नाही. घटस्फोट घेऊच नये असं नाही पण घेताना वादाची जी करणे आहेत ती खरचं विभक्त होण्यासारखी आहेत का ? दोघांतील वाद आपसात मिटेल का ? घटस्फोट घेतल्यावर पुढे काय करणार ? जर मुल बाळ असेल तर त्यांचं काय होईल त्यांच्या भविष्यच काय ? अशा प्रश्नांची उत्तरं आधी शोधवित नवरा बायकोचा घटस्फोट होतो खरा पण तो घटस्फोट फक्त त्या दोघांचा नसतो तो दोन कुटुंबाचा दोन व्यक्तींचा आणि त्यांच्या मुलांचा,मुलांच्या भविष्याचा घटस्फोट असतो.तुम्ही घेतलेल्या घटस्फोटाची खरी किंमत तुमच्या मुलांना मोजावी लागते कारण मुलांच्या वाढीसाठी,भविष्यासाठी आई आणि वडील या दोघांची आवश्यकता असते हे लक्षात घेणे खूप महत्वाचे आहे.आईचे प्रेम आणि बापाचा धाक लेकरांना मोठं करत असतो पण दोन्हीपैकी एकाची जरी कमी असेल तर मुलांचे भविष्य धोक्यात जाण्याची शक्यता असते.आई ही बाप बनू शकत नाही आणि बाप हा आई बनू शकत नाही.त्यासाठी दोघांची गरज मुलांना असते. तुमच्या घटस्फोटाच्या एका निर्णयाने तुमची मुलं गुन्हेगारी कडे वळण्याची शक्यता ही नाकारता येत नाही.मग प्रश्न उठतो आई बापांच्या संस्कारावर.मग समाज ही बोलतो की यांचा घटस्फोट झाला म्हणून मुलांना आईच प्रेम भेटलं नाही किंवा बापाचा ही धाक नाही म्हणून मुलं बिघडली. त्यामुळे हजार वेळा आपलं स्वतःच घर तोडताना विचार करा
मुलांचं भविष्याचा आणि स्वतःच्या भविष्याचा ही हजार वेळा विचार दोघाही पती पत्नीने करणे गरजेचे आहे .घटस्फोट घेऊच नका या मतचा मी नाही जर खरच योग्य कारण असेल, दोघांतील वाद मिटविण्याचा प्रयत्न करून तो वाद कधीच मिटणार नाही.दोघांना देखील एकमेकांपासून मानसिक आणि शारीरिक त्रास पराकोटीचा असेल किती ही प्रयत्न करून नाते टिकण्याची अपेक्षाच लोप पावत असेल तर शेवटचा पर्याय म्हणून घटस्फोट घ्यावा आणि तो ही घेत असताना मुलांचा आणि आपल्या दोन्ही कुटुंबाचा एकदा विचार करावा आणि मगचं शेवटी घटस्फोटाचा निर्णय घ्यावा.
माझे मत असे देखील नाही की कोणी त्रास वारंवार सहन करून नातं टिकवाव पण पहिला पर्याय म्हणून नाही तर शेवटचा पर्याय म्हणून घटस्फोटाकडे वळावे
शेवटी लग्न हे तडजोड केल्याशिवाय टिकत नाही एकाने रागवल तर दुसऱ्याने समजून घ्यायचं असत तर आणि तरच नाती टिकतात मुलांचे भविष्य सुधारते,घडते.
शेवटी प्रश्न तुमचा घटस्फोट घ्यावा की नाही ?
*ॲड.स्वप्नील जगताप*
(बारामती)
(९३०७७४३३१६ )
*चौकट*
सध्या समाजात सगळीकडे भेडसावत असलेला प्रश्न म्हणजे घटस्फोट..! लग्न म्हणजे दोन कुटुंब एकत्र येनं..आयुष्यभरांच्या दोन घराण्यांचे जन्मोजन्मीची व ऋणानुबंधाची नाती जुळलेली असतात.पण आजची पिढी सुशिक्षित व उच्चशिक्षीत झाली आहे पण अशा काही कुटुबांत विवाहानंतर पती-पत्नीत कलहाचे वातावरण निर्माण होते व त्याची पुढील पायरी म्हणजे...घटस्फोट..हा घटस्फोट घेतला तर प्रश्न संपतो का ? त्यामुळे आज ही न्यायालयात घटस्फोटांच्या अनेक केसेस चालू आहेत.घटस्पोट घेतला तर दोन घरांचे ऋणानुबंध संपुष्टात तर येतातच पण लग्न समारंभात सर्वांच्या समोर पती-पत्नी जन्मभराची साथ देण्याचे वचन देतात त्याचे काय ? आजकाल लग्न सोहळा म्हणजे दिखाऊ पणाच झाला आहे.घटस्पोटामुळे आपली संस्कृती व संस्कार लोप पावत चालली असल्याचे जाणवत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा