Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ३ नोव्हेंबर, २०२४

*लोकसभेप्रमाणे विधानसभेत "जयश्री पाटील "यांना 'नगरसेवक' मदन भाऊ- गटाची मते मिळतील??*



*इकबाल बाबासाहेब मुल्ला( पत्रकार )*

*सांगली*

 *मो:-8983 587 167*

मदनभाऊ पाटील घराण्यात आज अन्याय  झालेल्या "माऊली" जयश्री पाटील या अपक्ष म्हणून "मैदानात" आहेत ,

भाजपचे सुधीर गाडगीळ हें कासव गतीने  लक्ष्यवेध  करत आहेत ,आणि सांगलीत काँग्रेसचे एकाकी असणारे पृथ्वीराज पाटील यांचे वाढते बळ आज "दिलासादायक" आणि विधानसभेचे "चित्र"  बदलणारे ठरू शकते .

5 तारखेनंतर  विश्वजीत कदम आणि विशाल पाटील  यांनी एकत्रित प्रचार केल्यास   पृथ्वीराज पाटील यांचे "पारडे"  जड असू शकते. 



 *सुधीर गाडगीळ यांची शाश्वत कासव चाल !*

सांगलीत सर्वाधिक सुखी  मनुष्य अर्थात "उमेदवार" कोण असतील तर ते आहेत सुधीर गाडगीळ! कारण RSS आणि भाजपचा  नियोजनबद्ध प्रचार आणि गेल्या 1 वर्षांपासून कार्यरत असणारी निवडणुकीची रणनीती यामुळे भाजपचे सुधीर गाडगीळ आज  "बिनधास्त"  आहेत. काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांची अपक्ष बंडखोरी त्यांना माहित होती का ?? वसंतदादा बँकेसंदर्भातील "अर्थपूर्ण सहकार्य" आणि परतफेड याची "पूर्वकल्पना"  त्यांना होती का ??

 सुधीर गाडगीळ यांची मदतीचा हात पुढे करण्याची "खासियत"  त्यांना विजयपथावर  घेऊन जाणार असे दिसते. सुधीर गाडगीळ यांचे सांगलीतील अफाट कार्य सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. ,रस्त्यांचे  अभूतपूर्व जाळे, विविध पुलांची उभारणी , कामाचा प्रचंड  धडाका यामुळे त्यांचा गठ्ठा फिक्स आहे,यामुळेच  सुधीर गाडगीळ आज "निश्चित"  आहेत .


 *विधानसभेत जनता सुज्ञ !*


लोकसभा निवडणुकीत विशाल  पाटील यांच्यावर अन्याय झाला होता. वसंतदादा घराणे संपवणाऱ्या इस्लामपूर  च्या प्रवृत्तीची चीड होती,दादा घराणे आणि काँगेस पक्ष उध्वस्त करणाऱ्या शक्तींना "उत्तर"  देण्याची  रणनीती होती. ती निवडणूक सांगलीकर "जनतेने" हातात घेऊन अपक्ष असणाऱ्या विशाल यांना लोकसभेत पाठविले होते. 

स्व.मदनभाऊंच्या वारसांना अर्थात जयश्री पाटील यांना तिकीट मिळायला पाहिजे होते याबद्दल अजिबात दुमत नाही. कारण  त्यांचा तो हक्कचं आहे. परंतु 10 वर्ष राबणाऱ्या पृथ्वीराज पाटलांचे काय ?? असा ही प्रश्न  सांगलीत चर्चिला जातोय.

जी सहानुभूती लोकसभेत विशाल पाटील यांना होती तशीच मोठ्या प्रमाणात "सहानुभूती"  सध्यातरी जयश्री पाटील यांना दिसतं नाही असे चित्र आहे .

सांगली जनमानसाचा "कानोसा" घेतल्यावर , जनतेशी "संवाद"  साधल्यावर भाजपा विरुद्ध काँग्रेस अशीच "प्रमुख लढत" होईल अशी "चिन्हे"  आज दिसतं आहेत. 

वास्तविक मदनभाऊंच्या पश्चात जयश्री पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेणे "महागात" पडले आहे .कारण जयश्री वाहिनीच्या यांच्या नकारानंतर  पृथ्वीराज पाटील यांनी तिकीट मिळवले आणि 87000 मते घेतली.ते पराभूत झाले. त्यांनतर त्यांनी सांगली विधानसभा पिंजून काढली,आणि विधानसभेसाठी पुन्हा तिकीट मागितले. गेल्या 10 वर्षात ज्याप्रमाणे पृथ्वीराज पाटील सक्रिय होऊन,काँग्रेस पक्षासाठी "वाहून" घेतले,विविध आंदोलने केली ,मोर्चे काढले, जनतेला मदत केली, तोच प्रवाह,तिचं दिशा आणि तसेच कार्य जयश्री पाटील यांनी निरंतर आणि सातत्याने केले असते तर काँग्रेस

 *पक्षश्रेष्टी समोर जयश्री पाटील या  देखील तोडीस तोड *पर्याय*



 ठरल्या असत्या.आणि कदाचित त्यांना तिकीट देखील मिळाले असते.आणि मदनभाऊ नंतर त्या आमदार

 झाल्या असत्या. 

सांगलीच्या जनतेने गेल्या 5 वर्षातील राजकारण - समाजकारण उघड्या डोळ्याने पाहिले आहे ,सत्य आणि वास्तव ते ओळखतात. त्यामुळेच लोकसभेप्रमाणे यंदाच्या विधानसभेत योग्य उमेदवारालाच मतदान होईल याबद्दल तिळमात्र शंका नाही.

ज्या नगरसेवकांनी,मदनभाऊ  समर्थकांनी  लोकसभेत विशाल पाटील यांना मदत केली तसाच  आग्रह ते विधानसभा निवडणुकीत जयश्री पाटील यांच्यासाठी केल्यास सांगलीकर  जनता त्यांचे ऐकून मतदान करेल का ??  असे झाले तर निवडणूकीचे चित्र अतिशय वेगळे असेल .


*इकबाल  बाबासाहेब मुल्ला* 

( *पत्रकार* ) 

संपादक -सांगली वेध

संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली. 

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा