Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ४ नोव्हेंबर, २०२४

*२५४ माळशिरस विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत १२ उमेदवार तर १३ उमेदवाराची माघार!*

 


*अकलूज --प्रतिनिधी*

*केदार---- लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

२५४ माळशिरस (अ.जा.) विधानसभा मतदार संघातून आज माघारी उमेदवारी अर्ज घेण्याच्या दिवशी बारा उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.तर तेरा नामनिर्देशन भरलेले उमेदवारांनी आज आपले अर्ज माघारी घेतले आहेत.

          आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता.आता बारा उमेदवार माळशिरस विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.यामध्ये उत्तमराव शिवदास जानकर (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट),राम विठ्ठल सातपुते (भारतीय जनता पार्टी),सूरज अशोक सरतापे (बहुजन समाज पार्टी),राज यशवंत कुमार (वंचित बहुजन आघाडी),प्रा.डाॅ.सुनिल सुखदेव लोखंडे (राष्ट्रीय समाज पक्ष),अरूण मनोहर धाईंजे (अपक्ष),कुमार दादा लोंढे (अपक्ष),दादा विश्वनाथ लोंढे (अपक्ष), मनोजकुमार उत्तम सुरवसे (अपक्ष), रमेश अंकुश नामदास (अपक्ष), सुधीर अर्जुन पोळ (अपक्ष), त्रिभुवन विनायक धाईंजे (अपक्ष) हे बारा उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.तर आज माघारी घेतलेले उमेदवार शैलेश जनार्दन कोतमीरे (अपक्ष), विकास संदिपान धाईंजे (अपक्ष), ज्ञानेश्वर मारूती काटे (अपक्ष),प्रा.डाॅ.धनंजय तुकाराम साठे (अपक्ष),अतुल श्रीमंत सरतापे (अपक्ष),नागेश आबा जाधव (अपक्ष),प्रकाश वामन नवगिरे (अपक्ष),सोमनाथ अरूण भोसले (अपक्ष),मकरंद नागनाथ साठे (अपक्ष),नंदकुमार कृष्णाजी साळवे (अपक्ष),शरद गेना सावंत (अपक्ष),अनिल तानाजी साठे (अपक्ष),प्रेमसिंह ज्ञानदेव कांबळे (अपक्ष) या उमेदवारांनी आपला विधानसभा निवडणुकीतून आपले अर्ज माघारी घेतले.



           आज निवडणूकीत उभे राहिलेल्या बारा उमेदवारांचे अर्ज ठेवण्यात आले असून त्यांना निवडणूक चिन्हाचे ही वाटप करण्यात आले अशी माहिती प्रांताधिकारी व निवडणूक अधिकारी श्रीमती विजया पांगारकर यांनी दिली.सहाय्यक निवडणूक अधिकारी सुरेश शेजुळ,नायब तहसीलदार अमोल कदम उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा