*विशेष--- प्रतिनिधी*
*एहसान----मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
,*मो:-9096837451*
अकलूजयेथे महाराष्ट्र जनसेवा संघटनेच्या वतीने दरवर्षी होणारे श्रीराम अश्व प्रदर्शन २०२४ दिनांक ५ व ६ नोहेंबर रोजी होत असून अश्व प्रेमींनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन जनसेवा संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
येथील श्रीराम मंदिर आवारात हे प्रदर्शन गेली ६ वर्षापासून होत असून या अश्व प्रदर्शनात उत्तर प्रदेश,बिहार,आंध्र प्रदेश,तामिळनाडू आदी विविध राज्यातून विविध जातींचे अनेक गुणी,देखणे असे सुमारे २००/२५० अश्व येतात,एकेका अश्र्वाला फिरवून त्याचे प्रदर्शन केले जाते,प्रेमींना पाहण्यासाठी खास गॅलरी ची सोय केली जाते.हे प्रदर्शन अश्व प्रेमींसाठी पर्वणी समजली जाते,त्यामुळे ते पाहण्यासाठी विविध राज्यातील प्रेमीही मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात,यावेळी जातिवंत अश्र्वाना प्रमाणपत्र तसेच ट्रॉफी देण्यात येते.यावर्षी हे प्रदर्शन मंगळवार दिनाक ५ व बुधवार दि.६ नोहेंबर रोजी होत असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा