*अकलूज ---प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
अकलूज येथे मल्लिकार्जुन केंद्र (रामायण चौक) येथे बालसंस्कार व युवा प्रबोधन हिवाळी शिबिर रविवारी २२ डिसेंबर रोजी होणार आहे तरी जास्तीत जास्त मुलांनी या शिबिरामध्ये सहभागी व्हावे.
या शिबिरात मुलांकडून विविध कला व कृती करून घेतल्या जाणार आहेत.तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.यामध्ये वय वर्ष ३ ते ५ शिशुसंस्कार,वय ५ ते १५ बालसंस्कार आणि १५ वर्षांवरील मुलांना युवा प्रबोधन याप्रकारे घेण्यात येणार आहे.आपण सर्वांनी,मुले व मुलींनी उत्स्फूर्त सहभागी व्हावे.
या शिबिरामधून मुलांमध्ये नक्कीच चांगले संस्कार रूजवले जाणार आहेत.गुरुमाऊलींचे स्वप्न आहे की वृद्धाश्रम मुक्त भारत यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे.गुरुमाऊली नेहमी म्हणतात की घरोघरी पुंडलिक व श्रावण बाळ तयार व्हावेत.ही संकल्पना हाती घेऊन आपण या हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.तरी विद्यार्थी व पालक यांनी शिबिराचा लाभ घ्यावा.असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.तरी सर्व विद्यार्थी व पालकांनी वेळेवर उपस्थित राहावे.वेळ.सकाळी १० वाजता मुलांनी येताना सोबत जेवणाचा डबा व पाण्याची बॉटल घेऊन येणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा