*अकलूज ---प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयात २० डिसेंबर २०२४ रोजी संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे नियोजन वर्गशिक्षिका झगडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली इ.९वी तु. ब च्या वर्गाने केली होती
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनुज दळवी यांनी केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापक .घंटे सर होते अध्यक्षपदाच्या सूचनेस प्राजक्ता सलगर हिने अनुमोदन दिले. संत गाडगे बाबा (महाराज) यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष उप मुख्याध्यापक घंटे सर, उपप्राचार्य सय्यद सर, पर्यवेक्षक बोरावके सर, शिक्षक प्रतिनिधी काळे सर वर्गशिक्षिका झगडे मॅडम, सर्व विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून एक विद्यार्थी व एक विद्यार्थिनी यांच्या हस्ते करण्यात आले.
या थोर महापुरुषाच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या जीवनकार्याचा परिचय उम्मे आयम गौस बागवान हिने आपल्या भाषणातून करून दिला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचिता मोरे हिने केले तर आभार यादअली शेख याने मानले.
सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल, वर्गशिक्षिका . झगडे मॅडम , कार्यक्रमात सहभागी असणारे इ. ९वी (ब ) मधील विद्यार्थी या सर्वांनाच उपमुख्याध्यापकांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास उपमुख्याध्यापक, उपप्राचार्य, सर्व पर्यवेक्षक, शिक्षक प्रतिनिधी,सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा