*इक्बाल बाबासाहेब मुल्ला*
*(पत्रकार) सांगली*
*मो:-8983 587 160
माणसाला माणूस म्हणून जगण्याचा ज्यांनी "अधिकार" दिला,ज्यांनी महिलांना. मतदानाचा अधिकार दिला,ज्यांनी मनुस्मृती जाळून टाकली आणि "मानवजात सर्वश्रेष्ठ" आहे म्हणून ठणकावून सांगितले त्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा भारताचे गृहमंत्री अमित शहा यांचेकडून अनावधानाने अवमान झाल्याचे दिसतं आहे.
लोकसभेत. NDA मध्ये दलित खासदारांचे समर्थन घ्यायचे, "विधानसभेत" दलित आमदार घेऊन सरकार स्थापन करायचे आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीच अपशब्द वापरायचे ??? हे योग्य आहे का
भाजपचे समर्थन करणारे आणि लोकशाही ची "हत्या" करण्यासाठी आणि संविधान नष्ट करण्यासाठी "कूटनीती करणाऱ्या भाजपा/संघ यांच्याशी जवळीक असणाऱ्या रामदास आठवले यांनी अजूनदेखील अमित शहा यांचा अजूनही साधा निषेधही का केला नाही ??
त्याशिवाय प्रत्येक वेळी,वेळेनुसार आपली "भूमिका" बदलणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनीदेखील "तोंडावर बोट" ठेवले आहे. दलितांचे बेगडी प्रेम दाखवण्यापेक्षा स्वाभिमानाने डॉ.आंबेडकर यांच्याबद्दल झालेल्या अमित शहा यांच्या वक्तव्याचा कडक शब्दात निषेध व्हायला हवा होता.
ज्या लोकशाहीची बीजे डॉ.आंबेडकरांनी रोवली त्या महामानवाचे नावं किती वेळा घेता,"आंबेडकर - आंबेडकर" असे 7 वेळा* सांगत एव्हड्या वेळा नावं घ्यायच्या ऐवजी परमेश्वराचे नावं घ्या तो प्रसन्न होईल अशी "मुक्ताफळे काल अमित शहा यांनी उधळली.
सवर्ण जेथे "पाण्याला" हात लावू देत नव्हते त्या चवदार तळ्याजवळ 1927 रोजी पाणी पिऊन सर्वधर्मसमभाव सिद्ध करणारे महामानव सर्व पीडितांसाठी आणि पिंजलेल्या-गांजलेल्या जनतेसाठी परमेश्वरच आहेत.
संविधानचे निर्माते असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 7 वेळा नव्हे तर 700 करोड वेळा नावं घेतले तरी त्यांचे जगावरती असणारे उपकार. फिटणार नाहीत.
आज अमित शहा यांनी काल दिलेल्या वक्तव्य त्या वक्तव्याबद्दल दिलगीरी सोडा तर ते वक्तव्य चुकीचे होते हे कबूल केले नाही.याउलट डॉ.आंबेडकर यांच्याविषयी मी स्वप्नात देखील असे म्हणू शकत नाही असे म्हणत फिरवाफिरवी केली. मुळात डॉ.आंबेडकर यांच्याविषयी आदर असेल तर असे अनुदगार काढण्याचे कारणच काय ?? आंबेडकर हे उच्चशिक्षित होते 50 डिग्री त्यांच्याकडे होत्या.बाबासाहेबांचे महत्व शिक्षित /अशिक्षित लोकांना आहेच तथापि एखाद्या तडीपार व्यक्तीला त्यांचे महत्व काय कळणार ???
असो, डॉ.आंबेडकर यांच्याबद्दल बोलण्याची ही मजल गेली आहे.भविष्यात आणखी कोणीतरी उठून बोलेल.त्यामुळे समस्त दलित/ अल्पसंख्यांक आणि सर्व समाजबांधवांनी लोकशाही मार्गाने, "शांततेने" याचा निषेध करावा. "म्हातारी" मेल्याचं दुःख नाही पण "काळ" सोकावता कामा नये.
त्याशिवाय
"बाप तो बाप रहेगा"
हे ठणकावून सांगावे.
. *इकबाल बाबासाहेब मुल्ला*
( *पत्रकार* )
संपादक - सांगली वेध,
संपादक -वेध मीडिया न्यूज,सांगली.
*मोबाईल - 8983587160*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा