*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
फोर्ट येथील काँग्रेसच्या मुंबई प्रदेश कार्यालयावर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी हल्ला करून खिडक्या, दरवाजे आणि खुर्च्यांची तोडफोड केली. तसेच पक्षाच्या नामफलकावर शाईफेक करण्यात आली. आंदोलनादरम्यान काही भाजप कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयात घुसले. कार्यालयाबाहेरील सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या प्रतिमांवर त्यांनी शाई फेकली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे कार्यालयातील कर्मचारी घाबरले. त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आंदोलकांना ताब्यात घेतले.
या घटनेनंतर लगेच मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा काँग्रेस कार्यालयाबाहेर दाखल झाला. त्यावेळी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी लाठीचार्ज केला. तसेच धरपकडही केली. लोकशाही पद्धतीने हे आंदोलन नसून पोलिसांच्या आडून भाजपकडून हा हल्ला करण्यात आला आहे, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला.
कॉंग्रेस कार्यालयात घुसून तोडफोड करणा-या भाजयुमो कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणी १२ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यासह इतरांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असे सांगण्यात आले.
हे भाजपाचे कार्यकर्ते नसून भाजपाचे पोसलेले गुंड आहेत. आम्हीही आंदोलने केली आहेत, पण हातात दगड-गोडे घेतले नाहीत. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना त्याला विरोध म्हणून काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला होत असेल, खुर्च्या फोडल्या जात असतील आणि कोणाचा जीव घेण्याचा प्रयत्न असेल तर हे गंभीर आहे, असे कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा