*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
परभणी येथील जातीयवादी प्रवृत्तीचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी कोम्बिंग ऑपरेशन करून भीमसैनिकांना जबर मारहाण केली. त्याचबरोबर एलएलबीच्या तिसऱ्या वर्षास शिक्षण घेत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याला बेदम मारहाण करून परभणी पोलिसांनी त्याची लॉकअपमध्ये हत्या केल्याच्या निषेधार्थ जातीयवादी पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड याला बडतर्फ करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबरोबरच सोमनाथ सूर्यवंशी याच्या परिवाराला शासनाने ५० लाखाची मदत करावी यासाठी अकलूजमधील समस्त बौध्द समाजाने प्रांत कार्यालयावर विषाद मोर्चा काढण्यात आला.
जातीयवादी बांडगुळ असलेले पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड हे २०१८ साली भीमा कोरेगांव याठिकाणी कार्यरत असताना त्याठिकाणी दंगल झाली होती. नांदेडच्या अक्षय भालेरावचा खून झाला तेव्हा त्याठिकाणी हेच होते. त्यानंतर परभणी येथे बौध्द वस्तीत घुसून कोम्बिंग ऑपरेशन करणारे अशोक घोरबांडच आहेत. यावरून ते जिथे जिथे जातात त्याठिकाणच्या बौध्द कार्यकर्त्यांना टार्गेट करून सूडबुध्दीने कर्तव्य बजावत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बौध्द बांधवांतून त्यांच्याबद्दल उद्रेक झाल्याचे दिसून येत आहे. ज्या माथेफिरूने संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली तो माथेफिरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. पण तो जर खरंच माथेफिरू असता तर त्याला फक्त बाबासाहेबच का दिसतात? इतर पुतळे किंवा देवालये का दिसत नाहीत? एकंदरीत केंद्रासह महाराष्ट्र राज्यातही बहुमताने महायुतीचे सरकार असल्यामुळे काही हिंदुत्ववाद्यांना माज आलेला दिसत आहे. संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या माथेफिरूला भीमसैनिकांकडून मारहाण झाल्यानंतरही तो हॉस्पिटलमध्ये चांगल्याप्रकारे ट्रीटमेंट घेत आहे, तर एलएलबीचा तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी असलेला सोमनाथ सूर्यवंशी पोलिस स्टेशनच्या लॉकअपमध्ये मरत आहे. यावरून पोलिसांनी त्याला किती निष्ठुरपणे मारहाण केलेली असेल हे दिसून येते. म्हणूनच अकलूजमधील बौध्द समाजाने सारनाथ बुध्द विहारात बैठक घेऊन परभणी येथील जातीयवादी पोलिस प्रशासन व शासनाच्या विरोधात मोर्चाचे काढण्याचा निर्णय घेतला. यावेळी काढण्यात आलेला मोर्चा अत्यंत शिस्तबध्दरित्या काढण्यात आला.
यादरम्यान प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या सोपान दत्तात्रय पवार याच्यावर देशद्रोह व एट्रोसिटीसह भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा दाखल करावा, सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याच्या हत्येत सामील असलेल्या सर्व पोलिसांना शासनाने त्वरित बडतर्फ करून त्यांचेवर गुन्हे दाखल करावेत, संविधानरक्षक शहीद सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबियांना महाराष्ट्र शासनाने तातडीने ५० लाख रूपयांची मदत करावी, सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरीत सामावून घेऊन त्यांचे पुनर्वसन करावे, परभणी येथे पोलिस निरीक्षक म्हणून काम करणारे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड या अत्यंत जातीयवादी असलेल्या पोलिस निरीक्षकाने कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली परभणीमधील ४१ पुरूष व ९ महिलांना अटक करून जवळपास ४०० नागरिकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यामुळे अनेक बौध्द युवकांचे आयुष्य व भविष्य उध्वस्त होणार असल्याने शासनाने हे गुन्हे त्वरित मागे घ्यावेत, परभणी पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड हा जिथे कार्यरत असतो तिथे त्याच्या अधिपत्याखाली जातीयवाद वाढतो. जातीयवादाला तो खतपाणी घालतो, प्रवृत्त करतो. यापूर्वी भीमा कोरेगांव दंगल, नांदेड येथील अक्षय भालेरावची हत्या व सध्याच्या परभणी येथील घटनेमागे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड हाच असल्याने त्याचेवर कलम ३२ व सदोष मनुष्यवधासह एट्रोसिटी अंतर्गत कलम ३ (१), ३ (२) अन्वये गुन्हे दाखल करावेत. व त्यांना पदावरून त्वरित बडतर्फ करून त्यांच्या सर्व चल-अचल संपत्तीची आयकर विभागाकडून चौकशी व्हावी, वत्सलाबाई मानवते या महिलेस बेदम मारहाण करून त्यांना अर्धमेली केले अशा पोलिसांवर योग्य ते गुन्हे दाखल करून त्यांचे त्वरित निलंबन करावे, वत्सलाबाई मानवते यांना १० लाख रूपयांची त्वरित आर्थिक मदत करून शासनाने त्यांचे पुनर्वसन करावे, परभणी शहरातील सर्व पोलिस स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करून त्याची तपासणी करावी, पोलिसांनी केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनच्या कारवाईत बौध्द वस्तीत पोलिसांनी केलेल्या घरांचे व गाड्यांची नासधुसीची परभणी जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशनमध्ये निर्दोष असणाऱ्य परंतु जखमी झालेल्या नागरिकांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, परभणी पोलिसांनी केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनची न्यायालयीन चौकशी व्हावी, मात्र ती सेवानिवृत्त न्यायाधीशामार्फत न करता सिटींग न्यायाधीशामार्फतच करावी, परभणी शहरात १० डिसेंबर २०२४ रोजी पार पडलेल्या सकल हिंदू समाज मोर्चाचे संयोजक व या मोर्चात झालेल्या सर्वच भाषणांची सखोल तपासणी व्हावी व ज्यांनी प्रक्षोभक भाषण केलेले असेल त्यांचेवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी आदि मागण्या सदरच्या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत. अकलूजमधील समस्त बौध्द बांधवांनी पोलिसांशिवाय काढलेला कसलाही व्यत्यय न येता अत्यंत शांततेत पार पडला. या मोर्चात लहानांसह ज्येष्ठ नेत्यांचाही मोठ्या संख्येने सहभाग होता. यावेळी विजय वाकोडे व सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रध्दांजली अर्पण करून डॉ. बाबासाहेबांबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा