*अकलूज----प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयात सायन्स ऑलिॅम्पियाड फाउंडेशन, दिल्ली यांच्या वतीने दिनांक १० व १२ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय वाणिज्य ऑलिॅम्पियाड व आंतरराष्ट्रीय गणित ऑलिॅम्पियाड या परीक्षा अत्यंत शांततेत व सुरळीतपणे पार पडल्या. विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या केंद्रावर विद्यालयातील २३७ परीक्षार्थीनी परीक्षा दिली. तसेच या फाउंडेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय सामान्य ज्ञान, आंतरराष्ट्रीय इंग्लिश ऑलिॅम्पियाड, राष्ट्रीय विज्ञान ऑलिॅम्पियाड, आंतरराष्ट्रीय वाणिज्य ऑलिॅम्पियाड, आंतरराष्ट्रीय गणित ऑलिॅम्पियाड या वेगवेगळ्या परीक्षा चालू शैक्षणिक वर्षात पार पडल्या. यास विद्यालयातील ७१४ विद्यार्थ्यांनी भरघोस असा प्रतिसाद दिला. या सर्व परीक्षा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विभागाच्या समन्वयिका कल्पना जाधव, विभाग प्रमुख यास्मिन शेख, योगिता सोनार, अलिशा काझी, भक्ती तावरे, धनश्री माने, स्मिता कोळी, कोमल पवार, स्नेहा शिंदे या शिक्षकांनी परिश्रम घेतले. उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, उपप्राचार्य जाकीर सय्यद, पर्यवेक्षक उमेश बोरावके, धनंजय मगर यांच्या नियोजनातून परीक्षा यशस्वीपणे पार पडल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा