*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी -
टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 8378081147*
----- समाजातील तरूणांनी व्यवसायाबरोबर शिक्षणाचा पाया मजबूत करून शासकीय नोकरी पादाक्रांत करत समाजाची मान उंचवावी असे प्रतिपादन तांबोळी अत्तार बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेचे खजिनदार रफिक तांबोळी यांनी केले.
तांबोळी अत्तार बहुउद्देशीय समाजसेवी संस्था बावडा (ता.इंदापूर) यांच्या वतीने आरीफ सिकंदर तांबोळी यांची सेशन कोर्टात क्लार्क म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्यावेळी रफिक तांबोळी बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शौकत तांबोळी (पत्रकार), जेष्ठ सिकंदर तांबोळी, कार्यकारिणी सदस्य मुजमिल तांबोळी, रहिम तांबोळी, सहसचिव आसिफ तांबोळी, समिध तांबोळी, मोहंमद कैफ तांबोळी, मुजाहिद तांबोळी, रहिम तांबोळी (बांगी) आदि मान्यवर उपस्थित होते.
रफिक तांबोळी पुढे म्हणाले, मुस्लिम समाजातील तरूण सर्रासपणे शिक्षणाऐवजी व्यवसायाची निवड करत असतात. परंतू अशा हुशार, होतकरू तरुणांना शिक्षणासाठी पाठबळ देवून त्यांना शासकीय सेवेत जाण्यासाठी सर्वतोपरी मदत करावी. आजचा तरूण शिकल्यास समाजाची प्रगती होण्यास मदतीचे ठरेल. शिक्षणासाठी समाजाचे पाठबळ कायम राहील.
"मागील पाच वर्षांपासून अव्याहतपणे शासकीय नोकरीसाठी प्रयत्न करत होतो. पण माझे नशीब मला थोड्या थोडक्यात हुलकावणी देत होते. परंतू जिद्द, मेहनत व घरच्यांच्या पाठींब्यामुळे प्रयत्नाची पराकाष्ठा करून अखेर यश संपादन केले" असल्याचे आरीफ तांबोळी यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शौकत तांबोळी (पत्रकार) यांनी केले. तर सुत्रसंचलन समिध तांबोळी यांनी तर आभार आसिफ तांबोळी यांनी मानले.
फोटो - बावडा येथील आरीफ सिकंदर तांबोळी यांची सेशन कोर्टात क्लार्क म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा