*उपसंपादक -- नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेच्या वतिने भारतातील पहिल्या मुस्लिम मराठी शिक्षिका युगस्त्री फातिमाबी शेख यांच्या जयंती निमित्त एकदिवसीय तिसरे फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन १२ जानेवारी रविवार रोजी भालचंद्र ब्लड बँक, गांधी मार्केट लातूर या ठिकाणी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे
हे एकदिवसीय साहित्य संमेलन चार सत्रामध्ये आयोजित केले जाणार आहे. सकाळच्या प्रथम सत्रात उद्घाटन व कर्तृत्वान महिलांना फातिमाबी शेख पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. दुसऱ्या सन्त्रामध्ये परिसंवादाचे आयोजन केले आहे. तिसऱ्या सत्रामध्ये मान्यावर कविचे कविसंमेलन होणार आहे व शेवटचे समारोपाचे सत्र आयोजीत केले आहे.
ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था आयोजित पहिले फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन पुणे येथे आयोजीत केले होते तर दुसरे साहित्य संमेलन सोलापूर येथे संपन्न झाले तर तिसरे साहित्य संमेलन लातूर येथे आयोजीत केले आहे. सदर साहित्य संमेलन आयोजनाचा उद्देश हा प्राचीन आणि अर्वाचीन मराठी साहित्यात अनेक मुस्लिम मराठी संत कवी आणि साहित्यिकांचे योगदान राहिलेलेआहे. मराठी भाषिक मुस्लिम समाज महाराष्ट्राच्या संत, पुरोगामी, परिवर्तनवादी परंपरेचा वारसा सातत्याने
अभिव्यक्त व्हावा. मराठी
भाषेतून मुस्लिम साहित्यिकांनी लिहिलेल्या साहित्यावर विचार मंथन व्हावे. हेतूता मुस्लिम मराठी साहित्याचा, समाजाचाप्रवाह अधिक वृद्धिंगत करणे, मुस्लिम समाजाच्या व्याथा, वेदना, दुःख आणि अस्मितेची जाणीव साहित्यातून मांडणे, मुस्लिम समाजाविषयीचे समज, गैरसमज दूर करण्याच्या हेतूने संमेलन प्रयत्नशील हे आहे. मुस्लिम समुदायातून राज्य लिहिणाऱ्या अनेक लेखकांना नवे विचारपीठ उपलब्ध करून देणे आणि साहित्याच्या माध्यमातून समाजामध्ये सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि वैचारिक सौहार्दाचे वातावरण निर्माण करण्यासाठी हे संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनाला लातूरमधील साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मंडळींनी उपस्थित रहावे असे आवाहन ग्रामीण मस्लिम मराठी साहित्य संस्थेचे अध्यक्ष अॅड. हाशम इस्माईल पटेल, संमेलनाचे स्वागताध्यक्षइस्माईल शेख, ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेचे संस्थापक शेख शफी बोल्डेकर, उपाध्यक्ष खाजाभाई बागवान, सहसचिव अनिसा सिकंदर शेख, लातूर जिल्हाच्या अध्यक्षा तहेसिन सय्यद, कार्याध्यक्ष नदिम कादरी, उपाध्यक्ष अॅड. एकबाल शेख, सचिव अॅड. सिमा पटेल, रमेश हनमंते, कासार रशिद, रसुल पठाण, कलिम शेख, मतिन अब्बासी, जाफर शेख, जब्बार पटेल, डॉ. म. रफी शेख, महासेन प्रधान यांनी केले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा