*विशेष -प्रतिनिधी,राज मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो-8408 817 333
कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय व जुनिअर , सदाशिवनगर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने नियमित कार्यक्रमांतर्गत श्री दत्तात्रय जयंती निमित्त स्वच्छता हीच सेवा हे तत्व अंगी बाळगून स्वयंसेवकांनी सदाशिवनगर येथील दत्त मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविले. अभियानाची प्रेरणा ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य विजय निंबाळकर यांनी दिली होती. तसेच प्रशाला समिती सदस्य श्री. विष्णू भोंगळे यांनी स्वच्छतेविषयी सूचना केली होती. या अभियानाचे आयोजन प्राध्यापक बागल बी .व्ही यांनी केले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा