Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २९ जानेवारी, २०२५

*लातूर येथील- म. मुस्लिम कबीर -यांना "आफताब-ए-सहाफत"(पत्रकारितेचा सूर्य) पुरस्कार जाहीर....* *नांदेड येथे 2 फेब्रुवारी ला होणार पुरस्कार वितरण सोहळा*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

लातूर जिल्हा उर्दू मीडिया प्रमुख म.मुस्लिम कबीर यांना खादमीन-ए-उम्मत या स्वयंसेवी संघटने तर्फे जाहीर झालेला"आफताब ए सहाफत" (पत्रकारितेचा सूर्य) पुरस्कार २ फेब्रुवारी २०२५ रोजी नांदेड येथे दिला जाणार आहे. कबीर सर हे उर्दू जगतात "रोशन औसवी" म्हणून ओळखले जाते.

रोशन औसवी यांच्या गझल, कविता, उर्दू , मराठी आणि हिंदी वृत्तपत्रांत प्रसिद्ध होतात.म.मुस्लीम कबीर हे साप्ताहिक लातूर रिपोर्टरचे सहसंपादक आणि स्तंभलेखक देखील आहेत ते प्रत्येक वेळी आपले विचार मांडतात. कबीर बानी या नावाने त्यांचे स्तंभ लेख सुद्धा वाचनीय असतात. याशिवाय, ते गेल्या चाळीस वर्षा पासून मराठी, हिंदी आणि उर्दू पत्रकारितेच्या माध्यमातून कार्य करीत आहेत, ते सध्या डझनभर उर्दू वर्तमान पत्रांचे प्रतिनिधित्व करतात.

कबीर सरांचा उर्दू भाषा विषयी असलेला स्नेह आणि उर्दू भाषा जिवंत ठेवण्याच्या प्रयत्नाचा विचार करून नांदेडच्या खादमीन-ए-उम्मत या स्वयंसेवी संस्थेने विभागीय पत्रकारिता पुरस्कारासाठी निवड केली आहे.म.मुस्लिम कबीर यांना "आफताबे सहाफत" (पत्रकारितेचा सूर्य) विभागीय पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व पत्रकार व मित्र परिवारांच्या वतीने शुभेच्छा देण्यात येत आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा