*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
तुळजापूर येथे तुळजापूर शहर वासीयाकडुन सामुहिक राष्ट्रगीत व राज्यगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
कार्यक्रमाच्या प्रारंभी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमास तुळजापूरचे तहसीलदार अरविंद बोळंगे उपस्थित होते
प्रस्ताविक अमोल कुतवळ यांनी केले यानंतर तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, त्यानंतर तुळजापूर शहरातील गिरीश लोहारेकर,महेंद्र कावरे,र ऋषिकेश साळुंके,नितीन जाधव, व नितीन कासार या पाच समाजसेवकांचा सत्कार तहसीलदार यांच्या हस्ते करण्यात आला.यानंतर सर्वांनी उभारून सामूहिक राष्ट्रगीत व राज्यगीत म्हणण्यात आले आणि उपस्थित सर्व. विद्यार्थ्यांना खाऊचे तसेच पाण्याचे बाॅटलचे वाटप करण्यात आले,समाजामध्ये व विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता वाढावी, राष्ट्राप्रती व भारत मातेविषयी आदर वाढावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते . शेवटी विवेक कोरे सर आणि अॅड शेख यांनी उपस्थित आमचे आभार मानले हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी माजी नगरसेवक सुहास साळुंके,नागनाथ भाऊ भांजी,खोपकर सर , सुदर्शन वाघमारे,नागेश किवडे,वल्लभ आप्पा कदम,मोटे,लक्ष्मण नन्नवरे, अनंत कोंडो,रोटरी क्लब चे प्रशांत अपराध यांनी परिश्रम घेतले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा