Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २१ जानेवारी, २०२५

*तुळजापूर शहरातील अनेक असुविधा, आणि समस्या बाबत उपोषणकर्त्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मुख्याधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्याने 3 फेब्रुवारी पर्यंत आंदोलन स्थगित*


 

*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448*

तुळजापूर शहरातील विविध असुविधा, समस्या च्या विरोधात तुळजापूर तालुका महाविकास आघाडी व घटक पक्षाच्या वतीने 21 जानेवारी 2025 रोजी तुळजापूर नगर परिषदेसमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले  तुळजापूर महाविकास आघाडी व सर्व घटक पक्षाच्या वतीने तुळजापूर शहरातील अस्वच्छता, वाहतूक व्यवस्था सह तुळजापूर शहरातील अनेक विषयावरती नागरिकांना असुविधा होत आहे, दि. १५ जानेवारी २०२५ रोजी याबाबत आंदोलन करणेबाबत इशारा देण्यात आला होता. परंतू शहरातील होणाऱ्या असुविधांत बाबत कसलाही विचार झाला नाही व या असुविधा दूर करण्याचा प्रयत्न ही झाला नाही. त्यामुळे दि २१ जानेवारी २०२५ वार मंगळवार रोजी वरील विषयां संदर्भीय एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण नगर पालिकेसमोर करण्यात  आले अस्वच्छता, वाहतूक व्यवस्था, शहरातील लाईट व्यवस्था, विस्कळीत पाणी पुरवठा या आघाडीकडून नगर पालिकेस टाळे (कुलूप) लावे जाईल. असा इशारा निवेदनात देण्यात आला  होता त्या अनुषंगाने

  महाविकास आघाडीच्या प्रमुख मागण्या

१) शहरातील प्रचंड अस्वच्छता 

२) विस्कळीत ड्रेनेज व्यवस्था 

३) शहरातील बंद पडलेली लाईट व्यवस्था व अंधाराचे साम्राज्य 

४) शहरातील विस्कळी समतोल पाणीपुरवठा 

५) हुतात्मा स्मारक ते पावन गणपती रस्ता होणे बाबत 

६) शहरातील अतिक्रमणे हटवणे 

 ७) भाजी मंडई दररोज रस्त्यावर भरते त्याची योग्य ठिकाणी व्यवस्था करणे इत्यादी मागण्यासाठी लाक्षणिक उपोषण करण्यात अरे त्याप्रसंगी तुळजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी आश्वासन दिल्याने महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात येणारे उपोषण मागे घेण्यात आले मात्र येणाऱ्या 3 फेब्रुवारी पर्यंत या मागण्या पूर्ण झाल्या किंवा शहरातील समस्यांचे निवारण झाले तर 3 फेब्रुवारी नंतर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आला



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा