*उपसंपादक - नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्युज मराठी
माॅ जिजाऊ सार्वजनिक वाचनालय,खडकी बु.जि.अकाेला या संस्थेमार्फत दिला जाणारा राज्यस्तरीय जिजाऊ वाड्:मय पुरस्कार लेखक इंद्रजीत पाटील यांना देण्यात आला.राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीचे आैचित्य साधून हा पुरस्कार सन्मानपूर्वक त्यांना सुपूर्द करण्यात आला.त्यांच्या 'शेलक्या बारा ' या कथासंग्रहासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.या पुस्तकाला अल्पावधीतच मिळालेला हा सातवा राज्यस्तरीय पुरस्कार आहे.प्रस्तुत कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.जे.जी.वाहुरवाघ साहेब,सत्कारमुर्ती मा.प्रभाकर घुगे,उदघाटक मा.डाॅ.सुगत वाघमारे,मा.श्यामराव वाहुरवाघ व प्रमुख अतिथी,इतर मान्यवर व सदर वाचनालयाच्या संचालक मंडळाच्या उपस्थितीत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार त्यांच्या गैरहजेरीत प्रतिनिधी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डाॅ.मधुकर हुजरे,धाराशिव यांनी स्वीकारला.न्यू महसूल काॅलनी,हनुमान मंदिराजवळ खडकी बु. अकाेला याठिकाणी पंजाबराव बकाराम वर यांच्या मार्गदर्शनाखाली हा बहारदार कार्यक्रम उत्तमरित्या संपन्न झाला.लेखक इंद्रजीत पाटील यांचा ' शेलक्या बारा ' हा कथासंग्रह अवघ्या महाराष्ट्रभर प्रकाशझोतात असून त्यांच्या साहित्यिक कामगिरीचे सर्वत्र काैतुक हाेत आहे.त्यांचा आगामी 'चिबाड' कवितासंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे.ग्रामीण भागातील या प्रतिभाशाली साहित्यिकाचे सर्वत्र अभिनंदन हाेत असून हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव हाेत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा