*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समिती व प्रताप क्रीडा मंडळ शंकरनगर यांच्यावतीने शिवतीर्थ आखाङा शंकरनगर येथे दि. १२ ते १४ जानेवारी २०२५ या कालावधीत आयोजित केलेल्या अखिल भारतीय त्रिमूर्ती चषक स्पर्धा व वजन गट कुस्ती स्पर्धेला प्रारंभ झाला.यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील प्रमुख उपस्थित होते.
जयंती समारंभ समितीचे अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील व स्पर्धाप्रमुख सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन,आखाड्याचे पूजन व वजनगटातील कुस्ती लावून स्पर्धेचा प्रारंभ झाला.
या वेळी महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब मगर,राष्ट्रकुल विजेते रामचंद्र सारंग,भीमराव काळे,पांडुरंग एकतपुरे,विजय दोशी,रामचंद्र गायकवाड,नामदेव ठवरे,महादेव अंधारे,वसंतराव जाधव,मंडळाचे उपाध्यक्ष पोपटराव भोसले-पाटील,सचिव बिभीषण जाधव यांच्यासह परिसरातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेचे हे ४६ वे वर्ष आहे. स्पर्धेत दिल्ली,हरियाणा,पंजाब, उत्तर प्रदेश,महाराष्ट्र येथील राष्ट्रीय स्तरावरील मल्ल सहभागी झाले आहेत.ञिमुर्ती केसरी कुस्ती स्पर्धेसाठी खुल्या गटाकरिता प्रथम क्रमांकाचे बक्षिस त्रिमूर्ती केसरी चषक व दोन लाख रुपये,द्वितीय क्रमांकासाठी दिङ लाख रुपये, तृतिय क्रमांकासाठी एक लाख रुपये व चतुर्थ क्रमांकासाठी पन्नास हजार रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आले आहेत. तर वजनी गटासाठी २५ ते ८५ किलो पर्यंत एकूण १५ वजनगटानुसार विजेत्या व पराजित मल्लांनाही बक्षीसे देण्यात येत आहेत. या स्पर्धेत एकूण सुमारे ११ लाखाची रोख बक्षीसे आहेत.स्पर्धेत वजनी गटासाठी ५७८ व खुल्या त्रिमूर्ती स्पर्धेसाठी ६२ असे एकुण सुमारे ६४० मल्ल या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.स्पर्धेचा प्रारंभ २५ किलो गटातील धनराज पवार विरुद्ध धुळदेव बोडरे यांच्यात होऊन धनराज पवार विजयी झाला.८० किलो गटात हर्षद सावंत विरुद्ध राहुल चव्हाण यांच्यात होऊन हर्षद सावंत विजयी झाला.सायंकाळी उशिरापर्यंत दोन मैदानावर वजनी गटाच्या स्पर्धा सुरू होत्या.सूत्रसंचालन अशोक धोत्रे व आर.आर.पाटील यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा