*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
सोलापूर जिल्ह्यात सुप्रसिद्ध असलेल्या अकलूज येथील अॅपेक्स हॉस्पिटलमध्ये मोफत बाल हृदयरोग शिबीर शुक्रवार (ता. १७) रोजी आयोजित केले असून आवश्यक असणाऱ्या रुग्णांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तरी गरजूंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पेक्स हास्पिटल चे प्रेसिडेंट डॉ. राजीव राणे यांनी केले.
अॅपेक्स हॉस्पिटल आणि विश्वराज हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात सहभागी रुग्णांची व जन्मजात हृदयरोग असणार्या रुग्णांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व ईसीजी मोफत काढण्यात येणार असून २-डी इकोकार्डियोग्राफीसाठी मात्र माफक शुल्क आकारण्यात येणार आहे.
हृदयाच्या शस्त्रक्रिया शिबीरात विश्वराज हॉस्पिटल बालहृदयरोग तज्ञ डॉ. आशिष बनपूरकर, अॅपेक्स हॉस्पिटलचे बालरोग तज्ञ डॉ. राजीव राणे, शिशुपालरोगतज्ञ डॉ. मनिष राणे हे रुग्णांची तपासणी करणार आहेत. या शिबिरात हृदयाला छिद्र असणे, छिद्र डिव्हाईसच्या साहाय्याने बंद करणे यासह सर्व प्रकारच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा