Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १६ जानेवारी, २०२५

युगस्त्री फातिमाबी शेख राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने ॲड.फरहीन खान पटेल यांना गौरविण्यात आले.

 


उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी

ॲड.फरहीन खान पटेल व्यवसायाने अधिवक्ता असून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय उमरगा या ठिकाणी अधिवक्ता आहे.सन 2012 पासून त्या वकिली क्षेत्रात कार्यरत आहे. तसेच कायदेविषयक शिबिरामार्फत सार्वजनिक ठिकाणी घेण्यात येणारे कार्यक्रम तसेच अंगणवाडी,शाळा, महाविद्यालय, बचत गटातील महिलांचे कार्यक्रम तसेच महिलांशी संबंधित इतर कार्यक्रम इ.अश्या सर्व प्रकारच्या वरील घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमात त्यांचे हक्क जबाबदाऱ्या तसेच उज्वल भविष्याबद्दल मार्गदर्शन करून त्यांच्यामध्ये सक्षमीकरण,सशक्तिकरण, सबलीकरण आणि जागरूकता आणण्याचे कार्य करीत असतात.तसेच विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त लेख, व्याख्यान माध्यमातून त्यांचे विचार जन माणसापर्यंत पोहोचविणे व विविध विषयावर समाज प्रबोधन करण्याचे कार्य करीत असतात.तसेच विविध विषयांवर स्वरचित काव्य लेखन करून आपले विचार मांडत असतात. त्यांच्या कार्याबद्दल दखल घेऊन शांतिदूत परिवारातर्फे सामाजिक सेवा गौरव पुरस्कार,वनश्री पुरस्कार, ग्रामपंचायत कार्यालय दाबकाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार काव्य लेखन ई- पुरस्कार,लेखणी रत्न साहित्य ई- पुरस्कार तसेच राज्यस्तरीय महाराष्ट्र युवा नारीशक्ती भूषण पुरस्कार,अव्यक्त अबोली बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार,

प्राप्त झालेले आहे.

ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था महाराष्ट्र शाखा लातूर आयोजित तिसरे राज्यस्तरीय फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन लातूर येथील भालचंद्र ब्लड बँक येथे दि.१२/१/२०२५ रोजी संपन्न झाले. सुप्रसिध्द साहित्यिक लेखिका मलेका महेबूब शेख - सय्यद अध्यक्षा संमेलनाचे उद्घाटन प्रसिध्द विचारवंत माजी प्राचार्य नागोराव कुंभार यांनी केले. संमेलन सावित्रीबाई फुले यांच्या सोबतीण भारतातील पहिल्या मुस्लिम मराठी शिक्षिका युगस्त्री फातिमाबी शेख यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे मोईजभाई शेख,माजी महापौर विक्रांतजी गोजमगुंडे, ज्येष्ठ साहित्यिक फ. म. शहाजिंदे , अँड. हाशम पटेल , प्रा. मैनोद्दीन मुल्ला, संस्थापक कवी शेख शफी बोल्डेकर पहिल्या संमेलनाध्यक्षा कवयित्री अनिसा सिकंदर शेख, कवी खाजाभाई बागवान , डाॅ.इ.जा.तांबोळी , अफसर शेख , डाॅ.एहसानुल्ला कादरी , विजय वडेराव , जाफरसाहाब शेख आदि मान्यवर उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते स्व.ॲड.सिकंदर शेख दौंड यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा युगस्त्री फातिमाबी शेख राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार ॲड.फरहीन खान पटेल उमरगा यांना ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेच्या सहसचिव अनिसा सिकंदर शेख आणि लातूर जिल्हा अध्यक्षा तहसीन सय्यद ,उद्घाटन अध्यक्षा मलेका शेख सय्यद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.सुत्र संचालन नसीम जमादार यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा