Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १४ जानेवारी, २०२५

*मंगरूळ ता. तुळजापूर येथील जिल्हा परिषद प्रशालेची "शैक्षणिक सहल" संपन्न*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील जिल्हा परिषद प्रशालेची सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाची सहल 7 ते 11 जानेवारी या कालावधीत संपन्न झाली.


सहलीत विद्यार्थ्यांनी महाबळेश्वर, प्रतापगड किल्ला, रायगड किल्ला, शिवनेरी किल्ला, माहुली, सज्जनगड, उन्हे रे, रांजणगाव,काशिद बीच, पालीचा , शिखर शिंगणापूर बल्लाळेश्वर ,ओझर,अष्टविनायक, लेण्याद्री गणपती,मोरगावचा अष्टविनायक अशा विविध



ऐतिहासिक, धार्मिक व भौगोलिक स्थळांना भेट देऊन मनोरंजनातून ज्ञान मिळवले. समुद्र, खोल दऱ्या, उंच शिखरे, ऐतिहासिक किल्ले, धार्मिक स्थळे पाहून विद्यार्थी आनंदीत झाले. सहलीत ४३ विद्यार्थी व 4 शिक्षक सहभागी झाले होते. सहलीसाठी मुख्याध्यापक शिवाजी राठोड व शिक्षकांनी परिश्रम घेतले. सहल आयोजित करण्यासाठी शालेय समिती अध्यक्ष, सदस्य, नागरिक व पालक यांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा