*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
अकलूजमधील धन्वंतरी आयुर्वेदिक केंद्र मार्फत आयोजित केलेल्या अत्याधुनिक मशीनच्या सहाय्याने संपूर्ण शरीर आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन गिरझणी गावचे माजी सरपंच सतीश नाना पालकर आणी यशवंतनगरच्या सरपंच वर्षाताई सरतापे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या शिबीरात पंढरपूरचे आयुर्वेदाचार्य डॉ.प्रताप पवार यांनी रूग्णांची काॅम्प्युराईज्ड फुल बाॅडी चेकअप व आयुर्वेदिक चिकित्सा केली.
अकलूजमधील धन्वंतरी आयुर्वेदिक केंद्राच्या सुप्रिया मुदगल व रेश्मा शेख यांच्याकडून वाढत्या आजाराचं प्रमाण लक्षात घेता आयुर्वेदिक चिकित्सा शिबिराचं आयोजन करण्यात आले होते.या शिबीराला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.या शिबिरासाठी महर्षीनगर, गिरझणी,गोडसे वस्ती, उदयनगर,चौंडेश्वरवाडी, गायकवाड वस्ती व आसपास परिसरातून अनेक लोक आलेली होती.त्याचप्रमाणे अत्याधुनिक मशीनच्या सहाय्याने प्रत्येक उपस्थित व्यक्तीची ब्लडप्रेशर, हिमोग्लोबिन,शुगर पाहून उत्तम संपूर्ण शरीर तपासणी स्कॅनिंग मशीन साहाय्याने केली गेली. पंढरपूर येथील प्रख्यात आयुर्वेदाचार्य वीस वर्षाचा अनुभव असलेले तज्ञ डॉ.प्रताप पवार यांनी उत्तम आरोग्य कसे राखावे,आहार, सवयी,व्यायाम, प्राणायाम महत्त्व व योग्य आयुर्वेदिक औषध याबाबत मार्गदर्शन आणि सल्ला दिला.
या शिबिरासाठी गिरझणी गावचे सरपंच सतीश नाना पालकर,यशवंतनगरच्या सरपंच वर्षाताई सरतापे,सरपंच चौंडेश्वरवाडी,अलका शिवाजी इंगोले देशमुख,हर्षवर्धन गोडसे पाटील,यशवंतनगर ग्रामपंचायत सदस्य हिराबाई गोडसे पाटील, शीला गायकवाड सदस्य,कविता पिसे मेजर ज्ञानेश्वर बोडरे,दादासो जाधव,रमण कुंभार,जॉन टी शिंदे,दिपाली साठे आदी मान्यवर उपस्थित राहीले. आरोग्य शिबीर टीममधील दादा गवळी, गीतांजली आयवळे,लक्ष्मी दळवी,अर्चना भोंगळे,जयश्री जाधव,संतोष मुदगल,उमेश जोशी यांचे सहकार्य लाभले.
या आरोग्य शिबीराद्वारे घरोघरी आजारांवर नियंत्रण आणि वेळीच आयुर्वेदिक औषधी उपचार कार्य,निरोगी स्वस्थ शरीर हाच उद्देश असल्याचे आयोजक धन्वंतरी आयुर्वेदिक केंद्रच्या सौ.सुप्रिया मुदगल यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा