*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी -टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 8378081147
: श्री लक्ष्मी-नृसिंह देवस्थान मंदिरात मकरसंक्रांतीनिमित्त आज महिलांनी दर्शनासाठी गर्दी केली. यात्रेनिमित्त परिसरात सुमारे ७० विविध स्टॉल उभारण्यात आले यामधून काहीशी आर्थिक उलाढाल झाल्याचे सरपंच अर्चना नितीन सरवदे यांनी सांगितले. बावडा दूरक्षेत्राच्या वतीने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एसटी बस अभावी महिलांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला.
नीरा नरसिंहपूर (ता. इंदापूर) येथे संक्रांतीनिमित्त मोठी यात्रा भरते. आज पुणे, सोलापूर, नगर व सातारा जिल्ह्यातील शेकडो महिलांनी येथे हजेरी लावून श्री लक्ष्मी नृसिंहाचे दर्शन घेतले. महिलांनी एकमेकींना पानाचा विडा, तिळगुळ देऊन ओवसले. नीरा नरसिंहपूर ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने भाविकांसाठी सोय करण्यात आली होती. मुख्य बाजारतळावर विविध प्रकारची सुमारे ६० ते ७० दुकाने उभारण्यात आली होती.
नीरा नरसिंहपूरला येण्यासाठी बावडा-नरसिंहपूर, संगम- नरसिंहपूर; तसेच शेवरे- नरसिंहपूर या मार्गाचा प्रामुख्याने वापर भाविकांनी केला. वाहनतळाची सोय करण्यात आली. इंदापूर आगाराची एसटी बस ऐन सणासुदीत आगार प्रमुखांच्या अट्टहासी भुमिकेमुळे बंद राहील्याने महिलांना मोठे मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. अनेक महिलांनी इंदापूर आगाराचा निषेध व्यक्त केला.
चौकट - नीरा नरसिंगपूर येथील तीर्थक्षेत्र श्री लक्ष्मी नृसिंह हे दक्षिणेचे प्रयाग तीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे पुणे सोलापूर नगर सातारा यासह राज्यातील महिला मोठ्या संख्येने मंदिरात दर्शन व ओवसण्यासाठी हजेरी लावत असतात परंतु या ठिकाणी येण्यासाठी एसटी महामंडळाने कोणतीच सोय केली नसल्यामुळे पर्यायाने खाजगी वाहनांचा वापर करून महिलांना पोहचावे लागले. खाजगी वाहनांना अवाच्या सव्वा पैसे देऊन येण्याची वेळ महिलावर आली. सायंकाळी परततानाही मोठ्या अडचणींचा सामना महिलांना करावा लागला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे व खासदार सुप्रिया सुळे यांनी याची गांभीर्याने नोंद घेऊन संबंधितांना कडक शासन करावे अशी मागणी अनेक महिलांनी केली आहे.
फोटो - नीरा नरसिंहपूर येथील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात महिलांनी ओवसण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा