*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
श
दिनाक,२१ जानेवारी २०२५ रोजी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, श्री. तुळजाभवानी मंदिर गर्भगृह (गाभारा) बाबतीत उलटसुलट चर्चा होत असुन आई तुळजाभवानी देवीचा गाभारा किंवा गर्भगृह अतिशय शास्त्रशुध्द आणि शास्त्रानुसार झालेला आहे, याच्यात कुठलाही बदल होऊ नये कारण असाच एक प्रकार सुधारणेच्या व विकासाच्या नावाखाली झाला होता व त्यामुळे मंदिराच्या पावित्र्यास बाधा पोहचली आहे. तो विषय म्हणजे गायमुखाचे पाणी बंद झाले आहे. असा विकास किंवा दुरुस्ती केली जाऊ नये. असे काही करण्यापेक्षा ते करणे गरजेचे आहे का ? धोकादायक आहे का? या सर्व बाबींचा अतिशय शास्त्रशुध्द पध्दतीने योग्य त्या संस्थेकडुन चौकशी व्हावी, असे न झाल्यास व काही चुकीचे आणि तमाम हिंदु धर्माच्या श्रध्दास्थान छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवतास काही बाधापोहचल्यास संबंधितांना (तुळजाभवानी मंदिर संस्थान विश्वस्त) यांना जबाबदार धरुन न्यायालयीन व जनतेच्या दरबारात न्याय मागुन संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल व योग्य वेळी न्याय व्यवस्थाकडे न्याय मागितला जाईल याची कृपया नोंद घ्यावी.
तरी मा. साहेबांना विनंती करण्यात येते की, वरील निवेदनाचा विचार करुन आई तुळजाभवानी देवीचा गाभारा किंवा गर्भगृह अतिशय शास्त्रशुध्द आणि शास्त्रानुसार झालेला आहे, याच्यात कुठलाही बदल होऊ नये हि विनंती. नसता नाविलाजास्तव तुळजापुर महाविकास आघाडी व सर्व घटक पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी,यावेळी अमोल कुतवळ, अमर भैया मगर, शाम पवार, अमर भैया मगर ,भाऊ भांजी,अक्षय कदम ,नरेश पेंदे,भरत जाधव,नवनाथ जगताप, बबन गावडे,सुधीर कदम, राहुल खपले,शंतनु कुतवळ,बाळासाहेब मुळे,अभिमान सगट,विकास भोसले,बापूसाहेब नाईकवाडी,सुदर्शन वाघमारे, चंद्रकांत साळुंखे,तसेच महाविकास आघाडी शहरातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा