Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ३ जानेवारी, २०२५

*तुळजापूरचे तहसीलदार 'अरविंद बोळंगे 'यांना तात्काळ शासकीय सेवेतून कायमस्वरूपी निलंबित करावे--- मनसे जिल्हाध्यक्ष -गणेश पाटील*


 

*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:--  9730 867 448*

तुळजापूरचे तहसीलदार हे वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करता मनमानी कारभार करत असून चौकशी करून कारवाही करा अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष व भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे गणेश पाटील यांनी केली आहे


तुळजापूर तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी अरविंद बोळंगे यांनी त्यांच्या कामामध्ये बेजबाबदारपणा करून  सदर कामांमध्ये शिस्तभंग केले असून वरिष्ठांचे आदेश असतानाही जाणीवपूर्वक कारवाही केली नसून बेकायदेशीर रित्या वीट भट्टी चालकांना अभय दिल्याप्रकरणी त्यांची चौकशी करून त्यांना सेवेतून निलंबित करावे अशा प्रकारची मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी दिनांक 02 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे .

               सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की तुळजापूर तालुक्यात प्रदर्शन महामंडळ लातूर यांचा परवाना नसतानाही तसेच वीटभट्टी चालकांना शासनाने दिलेल्या नियमानुसार कोणतीही वीटभट्टी चालकाने कोणताही परवाना घेतला नसून सदर वीटभट्टीमुळे त्या परिसरातील जमीन नापीक होत असून सदर वीटभट्टी चालकांकडून कायदेशीर परवानगी न घेता खुलेआम वीट भट्टी चालक अवैद्यरित्या व्यवसाय करून शासनाचा लाखो रुपयाचा कर व शेतकऱ्यांच्या शेतीचे आर्थिक नुकसान करत असून संबंधित वीटभट्टी चालकाचे परवाने तपासून तपासून चौकशी योग्य ती कारवाही करावी म्हणून वारंवार निवेदन दिले होते तसेच ३० जून 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले .त्यावेळी जिल्हाअधिकारी यांनी तत्काळ तहसीलदार तुळजापूर यांना परवाने चेक करून अवैद्यरीत्या वीटभट्टी सील करण्याचे आदेशही देण्यात आले होते तरीही तहसीलदार यांनी साधारणता सहा महिने पेक्षा जास्त कालावधी झाला असूनही कुठल्याही प्रकारची अद्याप पर्यंत कारवाही केली नाही .त्यामुळे वीटभट्टी चालक व तहसील अधिकारी यांची आर्थिक लागी बंदी असण्याची दाट शंका दिसून येत आहे .





             तुळजापूरची तहसीलदार अरविंद बोळंगे  यांना वरिष्ठांचे पत्रव्यवहार प्राप्त होऊन पण जाणीवपूर्वक अवैद्यरित्या वीटभट्टी चालकांना अभय देतात का असा प्रश्न निर्माण झाला असून सदर प्रकरणी त्यांची तत्काळ चौकशी करून त्यांच्यावर शासकीय नियमाप्रमाणे वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करता वीटभट्टी चालकास आपसात संगणमत करून वीटभट्टी चालवण्यास परवानगी दिल्याप्रकरणी तत्काळ चौकशी करून त्यांना शासकीय सेवेमधून निलंबन करण्यात यावे .तसेच सदर प्रकरणांमध्ये दुय्यम सक्षम अधिकारी यांची नियुक्ती करण्यात यावी .अन्यथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यांच्या वतीने बेकायदेशीर चालणाऱ्या वीटभट्टीच्या व भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात आत्मदहन सारखा पर्यायी मार्ग अवलंबन करावा लागेल .होणाऱ्या परिणामास  संबंधित अधिकारी व वीटभट्टी चालक जबाबदार राहतील असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे या निवेदनावर जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांची स्वाक्षरी आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा