*अकलूज ----प्रतिनिधी*
* *शकुर तांबोळी
*उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला, नतमस्तक त्या सर्वांना.. ज्यांनी भारत देश घडवलाआहे
अकलूज - येथील सदाशिवराव माने विद्यालयात देशाचा ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला. या राष्ट्रीय कार्यक्रमाचे ध्वजारोहण अकलूजचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. एम के इनामदार यांच्या शुभहस्ते व शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज चे संचालक बाळासाहेब सणस, उत्कर्ष शेटे, प्रशाला समितीचे सदस्य इक्बाल काझी, आप्पासाहेब मगर, ॲड. रणजित माने-देशमुख, मुख्याध्यापक अमोल फुले, माता पालक, शिक्षक पालक संघाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
प्रारंभी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत, ध्वजगीत, महाराष्ट्र गीत सादर केले. यास विद्यालयाच्या सयाजीराजे वाद्य वृंदाने उत्कृष्ट संगीतमय साथ दिली. तदनंतर बँडपथकाच्या तालासुरात विद्यालयाच्या एनसीसी, आरएसपी, स्काऊटच्या पथकांनी नेत्रदिपक असे संचलन केले. या संचलानाचे नेतृत्व पथक प्रमुख इशांतराजे देशमुख, पायलट प्रमुख सुज्योत पंडित, ओम गायकवाड यांनी केले. संचलनानंतर विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक सामुदायिक कवायतीचे सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापकांनी केले. त्यांनी सर्वाना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन त्याचे महत्व विषद केले. पुढे बोलताना यावर्षी विद्यालयाने कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक सह विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी केली असून सर्वत्र उज्वल यश संपादन केले असल्याचे सांगितले.
यानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिकांचे व बक्षीसांचे वितरण करण्यात आले. यामध्ये सायन्स ऑलिम्पियाड परीक्षेत सुवर्ण, रजत, कास्य पदक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना पदकांचे वितरण केले. यानंतर संग्रामसिंह मित्र मंडळाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय लेझीम स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद व प्रथम क्रमांक आलेल्या मुला-मुलींच्या संघांना श्रीकांत राऊत यांनी प्रत्येकी रोख १००० रु.चे बक्षीस दिले. तसेच भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत प्रविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफीचे व प्रमाणपत्राचे वितरण केले. भूगोल उपक्रमशील मुख्याध्यापक अमोल फुले व उपक्रमशील शिक्षक म्हणून पुरस्कार मिळालेल्या सहशिक्षिका लक्ष्मी अस्वरे यांना ट्रॉफीचे वितरण करून सन्मानित करण्यात आले.
विशेष सन्मानामध्ये मुंबई येथे झालेल्या राज्याच्या पथसंचलनात सहभागी झालेला विद्यालयाचा माजी एनसीसीचा विद्यार्थी आदित्य निंबाळकर यास सन्मानित करण्यात आले.
पारितोषिक वितरण समारंभानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीताचे व लेझीमचे उत्कृष्ट सादरीकरण केले. सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. इनामदार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी संविधानाचे महत्त्व सांगून देशाचे सुजाण नागरिक होण्यासाठी संविधानाचे तत्व अंगी बाळगावे. आपली आवड ओळखून ध्येय गाठावे. आधुनिक युगात अनेक क्षेत्रात संधी असून तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःचा विकास करावा. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांची ओळख करून त्यांना प्रोत्साहन द्यावे. असा मौल्यवान सल्ला दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संचलन, सामुदायिक कवायतीचे, सांस्कृतिक गीताचे, लेझीमचे कौतुक केले.
या कार्यक्रमास रात्र शाळेचे मुख्याध्यापक संजय मुंगसे, विद्यालयाचे उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, उपप्राचार्य जाकीर सय्यद, भारत शिंदे, पर्यवेक्षक उमेश बोरावके, धनंजय मगर, भीमाशंकर पाटील, शिक्षक प्रतिनिधी संजय जाधव, राजाराम काळे, प्रमिला राऊत शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामस्थ, बहुसंख्य पालक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपट पवार व स्मिता दळवी यांनी केले. कार्यक्रमांची सांगता 'सारे जहाँ से अच्छा' या देशभक्तीपर गीताने झाली.
विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाने शेवट गोड करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा