*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
माळशिरस तालुक्यातील २५/४ लवंग येथील फिनिक्स इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये गणतंत्र दिनी प्रमुख पाहुणे माजी सैनिक मनोहर भोळे , गणपत उन जाधव,सीताराम भोसले यांनी ध्वज वंदन केले व वीर पत्नी पूनम विकास गिरीमकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी शहीद विकास गिरीमकर यांच्या पत्नी पूनम गिरीमकर यांना शाळेच्या संस्थापक अध्यक्षा नूरजहाँ शेख यांनी हळद कुंकू लावून शहीद जवान हे अमर आहेत वीर पत्नीना हळद कुंकू लावणे हाच खरा सन्मान आहे असे सांगून समाज परिवर्तनाचे पाऊल उचलले .
माजी सैनिक मनोहर भोळे , गणपत जाधव ,सीताराम भोसले ,डॉ.प्रतीक्षा ठोंबरे ,वीर पत्नी पूनम गीरीमकर,संकेत पिसाळ , योगेश रेडे पाटील ,गणेशगवच्या माजी सरपंच उषा रामचंद्र ठोंबरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . शाळेतील विद्यार्थ्यांनी हिंदी मराठी इंग्रजी भाषेतून भाषण करून आपले देशा विषयीचे प्रेम व्यक्त केले व देशभक्तीपर गीतांवर बहारदार नृत्य करून उपस्थितांची मने जिंकली .
नुकतीच वैद्यकीय क्षेत्रातील FMGE ही परीक्षा उत्कृष्ठ गुणांनी पास झालेल्या M.B.B.S
डॉ. प्रतीक्षा यांनी आपले प्राथमिक ते डिग्री घेण्या पर्यंतचा शैक्षिक प्रवास व अनुभव सांगत विद्यार्थ्याना महत्वपूर्ण असे मोलाचे मार्गदर्शन केले .
डॉ.प्रतीक्षा यांचे वडील रामचंद्र ठोंबरे आपले विचार व्यक्त करताना म्हणाले पालकांनी मुलगा मुलगी असा भेद न करता मुलांचे सुप्त गुण ओळखून आपल्या मुलांच्या पंखात बळ देण्याचे कार्य सदैव केले पाहिजे .
हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता पालक संघाचे अध्यक्ष नीलेश वाघ ,उपाध्यक्ष महादेव कोळेकर महिला पालक संघ अध्यक्षा शीतल भुजबळ उपाध्यक्षा माया कोळी ,गुलशन शेख ,तमन्ना शेख यांनी प्रयत्न केले .
नीलेश वाघ यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा