Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २६ जानेवारी, २०२५

*राऊतनगर -अकलूज येथे रत्नाई बहुउद्देशीय अपंग सेवा संघ अकलूज संचलित वृद्धाश्रम व अपंगाश्रमात "प्रजासत्ताक दिन "साजरा*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

राऊतनगर अकलूज येथील रत्नाई बहुउद्देशीय अपंग सेवा संघ वृद्धाश्रम व अपंगाश्रमात प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला

       प्रारंभी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे "अफसार अहमद शुकुर मोहम्मद खान समरी" यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणानंतर तिरंगा ध्वजास सलामी देण्यात आली. सलामी नंतर राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले

    त्यानंतर उपस्थित प्रमुख पाहुणे व रत्नाई बहुउद्देशीय अपंग सेवा संघ या संस्थेस देणगी देणाऱे लडकत साहेब ,देशमुख साहेब खान सर नाना जवंजाळ ,नदाफ साहेब व उपस्थित मान्यवरांचा रत्नाई बहुउद्देशीय सेवाभावी संघ या संस्थेचे कार्यकारी मंडळाचे महेबूब सय्यद आणिअध्यक्षा नूरजहां अरबाज खान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

     



  तसेच रत्नाई बहुउद्देशीय सेवा संघ या संस्थेच्या 15 व्या वर्धापन दिन व प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्यामध्ये रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, संगीत खुर्ची ,गायन स्पर्धा ,इत्यादी उपक्रम घेण्यात आले आणि लागलीच या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले या स्पर्धेसाठी एक तासाचा वेळ देण्यात आला होता 

स्पर्धेतील विजेत्या महिलांसाठी ,प्रथम बक्षीस -पैठणी साडी ,द्वितीय- 501 रुपया आणि तृतीय 201 रुपये 

गायन स्पर्धेसाठी ,प्रथम बक्षीस- साडी किंवा 1000 रुपये द्वितीय- 500 रुपये व तृतीय 2001 रुपये 

चित्रकला स्पर्धेसाठी, प्रथम बक्षीस- पैठणी साडी, द्वितीय -500 रुपये व तृतीय 201 रुपये व उत्तेजनार्थ 51 रुपये देण्यात आले चित्रकला स्पर्धेमध्ये मुलींसाठी पहिले बक्षीस 51 रुपये दुसरे बक्षीस 21 रुपये तिसरे अकरा रुपये व उत्तेजनार्थ एक वही देण्यात आली हे बक्षीस उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले

   या प्रजासत्ताक दिनानिमित्त व संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या गणवेश वाटप करण्यात आले

  तसेच ज्ञानमूर्ती दोरकर सृष्टी नवगिरे सोनाली कांबळे हर्ष शिंदे प्रतिश साळुंखे प्रीती साळुंखे राजश्री दिघे व सोनाली कांबळे यांनी स्पर्धेत यश प्राप्त केल्याने बक्षीस देण्यात आले 

स्पर्धेत यशस्वी झालेल्या महिलांमध्ये

वैशाली मायाप्पा कांबळे, मनीषा भारत शिंदे ,भाग्यश्री शशिकांत शिंदे, शैला मेघराज शिंदे ,शीरसा अनिल पवार ,प्रीती इंगळे ,यांनाही बक्षीस देण्यात आले

   मुलींमध्ये बक्षीसास पात्र ठरलेल्या -राजनंदिनी मायाप्पा कांबळे ,भावना भारत शिंदे, सृष्टी विनायक नवगिरे नीलम आझाद मौर्य ,अमृता मेघराज शिंदे ,आनंदी आकाश पवार ,लक्ष्मी रमेश शिंदे ,अमृता गोवर्धन वायकर, रेश्मा सचिन पाटोळे, चांदणी आझाद मौर्य, इत्यादी

  शेवटी उपस्थित प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे संस्थेच्या अध्यक्षा नूरजहान खान यांनी आभार मानले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा