Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २५ जानेवारी, २०२५

चैतन्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त निबंध व वक्तृत्व स्पर्धा

 


*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी -टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 8378081147

-----चैतन्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

   नीरा नरसिंहपूर येथील चैतन्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांना इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती अध्यक्षा संगिता श्रीकांत दंडवते यांचेवतीने प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकास शालेय दप्तर (सॅग) व उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांस स्टिफीनबॅग देण्यात आल्या. या स्पर्धेत एकूण ३५ विद्यार्थी सहभागी झाले होते. बक्षीस वितरण कार्यक्रम शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका सौ. भाग्यश्री दंडवते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सुनबाई सौ. तेजस्विनी भरणे उपस्थित होत्या. 

    कार्यक्रमास शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह श्रीकांत दंडवते, सरपंच सौ. अर्चना सरवदे, सौ. वैदेही दंडवते, सौ. अश्विनी कोळी, निलोफर पठाण, सौ. उज्वला परदेशी, आनंद कासट पंढरपूर, अंकुश साबळे, वैभव साबळे, विद्यालयाचे मुख्याध्यापक गोरख लोखंडे उपस्थित होते. 

     स्पर्धा जेष्ठ मराठी विषय शिक्षक श्रीमंत पडळकर सर व सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या. सदर कार्यक्रम सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर सेवकांच्या सहभागातून यशस्वी झाला. सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते तिळगूळ देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख अंकूश लावंड सर यांनी केले.





फोटो - नरसिंहपूर येथील चैतन्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे वाटप करताना मान्यवर दिसत आहेत.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा