Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २० जानेवारी, २०२५

*लक्ष्मीबाई कन्या प्रशाला यशवंत नगरच्या शाळेचे एलिमेंट्री व इंटर मिजिएट चित्रकला स्पर्धेत घवघवीत यश...*

 


*अकलूज ---प्रतिनिधी*

 *शकुर--तांबोळी*

 *टाइम्स 45 न्यूज मराठी

कला संचालनालय महाराष्ट्र राज्य वतीने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंट्री व इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा मध्ये शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित लक्ष्मीबाई कन्या प्रशाला, यशवंतनगर चा निकाल 100% लागला.एलिमेंटरी ग्रेड परीक्षेसाठी प्रशालेतील एकूण ३४ विद्यार्थिनी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेसाठी एकूण २५ विद्यार्थिनी परीक्षेला बसल्या व या सर्व ५९ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या,प्रशालेचा निकाल १०० टक्के लागला असून . कु.शतरुपा अमोल इंगोले , कु.सोनाली पांडुरंग शिंदे , कु.प्रतीक्षा शंकर मस्के या विद्यार्थिनी * 'अ ' श्रेणी * ने उत्तीर्ण झाल्या. 'ब' श्रेणीत* १८ विद्यार्थिनी ,३९ विद्यार्थिनी क श्रेणीत उत्तीर्ण झाल्या.सर्व यशस्वी विद्यार्थिनींना प्रशालेत प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक -जयसिंह मोहिते- पाटील,संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते- पाटील,संस्थेच्या संचालिका तथा प्रशालेच्या सभापती कु.स्वरूपाराणी मोहिते-पाटील, सचिव -.अभिजीत रणवरे , .खराडे साहेब तसेच प्रशाला समितीचे सर्व सदस्य,मुख्याध्यापिका अनिता पवार मॅडम यांनी यशस्वी सर्व विद्यार्थिनींचे कौतुक व अभिनंदन केले.यशस्वी सर्व विद्यार्थिनींना प्रशालेचे चित्रकला शिक्षक .विशाल लिके यांचे मार्गदर्शन लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा