*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी -टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 8378081147
रविवार दिनांक १९ जानेवारी २०२५ रोजी शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिवेशनात महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिळवळ यांच्या हस्ते व पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रदिपदादा गारटकर, इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत आबा कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीस पदी क्षितीजदादा वनसाळे यांची निवडीचे पत्र देण्यात आले. क्षितीज वनसाळे हे इंदापूर तालुक्याचे विदयमान आमदार व महाराष्ट्र राज्याचे क्रिडा मंत्री दत्तात्रय भरणे यांचे निकटवर्तीय मानले जातात. यावेळी विधानपरिषदेचे आमदार अमोल मेटकरी, युवक प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, अभिजित बनसोडे, संतोष तोरणे, सदाशिव सुर्यंगंध, बाळासो कांबळे, श्रीमंत जाधव, आप्पासाहेब गोतसुर्यं हे उपस्थित होते.
यावेळी क्षितीज वनसाळे यांनी बोलताना सांगितले की, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, क्रिडा मंत्री दत्तामामा भरणे, जिल्हा अध्यक्ष प्रदीप दादा गारटकर, तालुका अध्यक्ष हनुमंत आबा कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष वाढीसाठी , पक्षाच्या ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करू.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा