Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २० जानेवारी, २०२५

*विजयवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित विविध विकास कामाचे उद्घाटन कार्यक्रम संपन्न*

 


*अकलूज --प्रतिनिधी*

*केदार---- लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

माळशिरस तालुक्यातील मौजे विजयवाडी येथील ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन व रस्त्यांचे भूमिपूजन अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील,आ.रणजितसिंह मोहिते-पाटील,आ.उत्तमराव जानकर,माळशिरस पंचायत समितीचे उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

          या विकास कामामध्ये सकट वस्ती येथील सभामंडप आठ लाख रुपये कामाचे भूमिपूजन,लावंड वस्ती येथील सभा मंडप आठ लाख रुपये, भंडारे वस्ती ते सकट वस्ती रस्ता बावीस लाख रुपये,जलजीवन मिशन योजना ८२ लाख रुपये कामाचे लोकार्पण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय मदनसिंह मोहिते पाटील साहेब,आ.रणजितसिंह मोहिते पाटील साहेब व आमदार उत्तमराव जानकर साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले.



         यावेळी माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील,माजी सभापती मच्छिंद्र आबा ठवरे, माजी जिल्हा परिषद सदस्या सुनंदाताई फुले,सहकार महर्षी साखर कारखान्याचे संचालक भीमराव नाना काळे,शंकरराव मोहिते पाटील सूतगिरणीचे चेअरमन सुभेदार आप्पा काळे, केपी काळे,पांडुरंग तात्या वाघमोडे,पंचायत समिती माजी सदस्य अजय सकट,बाळासाहेब तरसे,माजी सरपंच बाळासाहेब काळे,उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग माळशिरसच्या सौ.टी.एन.हुन्नुरे मॅडम,वैद्यकीय अधिकारी डॉ.ए. बी.आव्हाड,गटनेते आप्पा इंगळे, सरपंच उमेश भंडारी, उपसरपंच रवींद्र इंगळे,माजी उपसरपंच शंकर वाघमोडे,पोलीस पाटील अनिल लावंड, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब इंगळे,प्रल्हाद लावंड, ग्रामसेविकास मनिषा साठे मॅडम,विजयवाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

        

*चौकट* 

जल जीवन मिशन योजनेअंतर्गत विहिरीसाठी दोन गुंठे जागा बक्षीस पत्र दिल्याबद्दल माजी उपसरपंच शंकर वाघमोडे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा