*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
भारतातील मुस्लिम या मातीशी एकनिष्ठ. असून देशाशी "इमान" राखून आहे. तो मेल्यानंतर देखील याच मातीत "दफन" होणार आहे. त्याचे अस्तित्व हवेत "नष्ट" होणार नाही.
भारताचा शत्रू. असणाऱ्या पाकिस्तानचा आपण तिरस्कार करतो. पाकिस्तान आपला शत्रू असेल तर ज्या मिरजेत आमदार आणि माजी पालकमंत्री श्री. सुरेश खाडे यांना मिरजेतील मुस्लिमांनी 4 वेळा जात-पात-धर्म-पंथ न पाहता भाजपा हा पक्ष न पाहता भरघोस मतदान केले त्यांच्यावर "प्रेमाचा" वर्षाव केला त्या "मुस्लिमांचे" "मतदान" आपणाला कसे काय चालते ?
ज्या भाजपा या राजकीय पक्षामध्ये मुस्लिम कार्यकर्ते आणि नेत्यांनी सुरेश खाडे यांच्या विजयासाठी
"जीवाचे रान" केले त्यांच्या प्रयत्नांना आणि प्रामाणिक मदतीला आपण काय "नावं" द्याल ??? कर्तृत्वसंपन्न आमदार म्हणून ज्या मुस्लिमांनी आपणास मतदान. केले त्या "मतदात्याला" काय "उत्तर" द्याल ??? मिरजेची ओळख ही ख्वाजा शमना मीरासाहेब आणि अंबाबाई यांच्या दर्गाह आणि मंदिराने होते. मीरासाहेब यांच्या उरसात गिलाफ चा पहिला मान "चर्मकार" समाज बांधवाना असतो, जर मिरजेची तुलना पाकिस्तानशी केली तर हा या सन्माननीय आणि दैदिप्य्ममान श्रद्धास्थान असणाऱ्या "खाजा मीरासाहेब "यांचा अपमान होत नाही का ??? अंबाबाई देवीचा अपमान होतं नाही का??
मिरज ही सर्वधर्मसमभाव. जपणारी पवित्र नगरी आहे. परंतु भाषणाच्या ओघात, श्रोत्यांना प्रभावित करण्यासाठी मिरजेचे पावित्र्य. भंग करणे ही दुर्दैवी बाब आहे. "काळ" निघून जात असतो परंतु शब्दाचे * व्रण हे "मनःपटलावर" उमटत असतात. आणि त्याचे "पडसाद" देखील "चिरंतर" जाणवत राहतात.
*इकबाल बाबासाहेब मुल्ला*
( *पत्रकार* )
संपादक - सांगली वेध
संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.
*मोबाईल - 8983587160*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा