*पुरंदावडे ----प्रतिनिधी*
*प्रा--अर्जुन ओवाळ*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
् माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे येथील रहिवासी श्री. शशिकांत पुरुषोत्तम कुलकर्णी यांना पं. दीनदयाळ उपाध्याय हिंदी विद्यापीठ मथुरा (उ.प्र.) यांची विद्या वाचस्पती पदवी जाहीर करण्यात आले आहे.
श्री. कुलकर्णी हे ३५ वर्षापासून अकलुज च्या शिवरत्न शिक्षण संस्थांच्या शंकरराव मोहिते पाटील ईंग्लिश स्कूल ॲंड जुनियर कॉलेज धवल नगर यशवंतनगर येथे हिंदी विषयाचे शिक्षक म्हणून काम करत आहेत.
त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन हिंदी शिक्षक संघ सोलापूर यांचा हिंदी शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. हिंदी मध्ये लिखाण करुन प्रचार, प्रसार केला आहे. तज्ञ हिंदी शिक्षक म्हणून शिक्षकांना व विद्यार्थीना मोलाचे मार्गदर्शन केले आहे. अनेक विद्यालया मध्ये व्याख्याने दिली आहेत व दहावीच्या विद्यार्थीना मार्गदर्शन केले आहे.
पत्रकार व लेखक म्हणून विविध प्रकारच्या प्रसार माध्यमातून हक्क, कर्तव्याची जाणिव करून दिली आहे.
२७ एप्रिल २०२५ रोजी भव्य कार्यक्रमात सत्कार करुन पदवी दिली जाईल असे विद्यापीठाने पत्राद्वारे कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा