*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
तुळजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कार्यकर्ते अमोल शिवाजीराव जाधव यांनी आज ठाणे येथील आमदार व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री "प्रताप सरनाईक", माजी खासदार रवींद्र गायकवाड माजी आमदार- ज्ञानराज चौगुले, धाराशिव जिल्हाप्रमुख मोहन पनोरे यांच्या प्रमुख उपस्थित पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या निवासस्थानी शिवसेना (बाळासाहेब ठाकरे पक्षात) एकनाथ शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे
'अमोल जाधव' हे सर्वसामान्य शेतकरी ,गोरगरिबासाठी, रस्त्यावर उतरून न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन करतात मात्र वरिष्ठ स्तरावर त्यांच्या आंदोलनाला न्याय मिळवून दिला जात नाही त्यामुळे" एक कॉल प्रॉब्लेम सॉल "या अटीवर त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला आहे,
धाराशिव जिल्ह्यातील व तुळजापूर तालुक्यातील शासकीय प्रशासकीय कार्यालयातील आणि अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेले अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे त्यांनी उघडकीस आणले शिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कारखाना प्रशासनाच्या विरोधात आणि तुळजापूर येथील आठवडी बाजार पूर्वीपासून मंगळवारी भरवला जात होता मात्र अलीकडे च्या काळात तो बाजार इतर दिवशी भरणार असल्याचे प्रशासनाने निर्णय घेतला होता त्या प्रसंगी त्यांनी आठवडी बाजार मंगळवारीच भरावा या मागणीसाठी आंदोलन केले आणि त्याला यश आले. मात्र त्याला वरिष्ठ स्तरावरून महत्त्व दिले जात नव्हते म्हणून त्यांनी शिवसेना( बाळासाहेब ठाकरे)एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला असून या माध्यमातून मी सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी आणि दिनदुबळ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे" टाइम्स 45 न्यूज मराठी "शी बोलताना व्यक्त केले
याप्रसंगी राहुल शिंदे ,संभाजी निपटे, संजय गायकवाड ,तसेच बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा