Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ९ जानेवारी, २०२५

*देशाचे सुजाण नागरिक बनवायचे असेल तर आपल्यावर चांगले संस्कार झाले पाहिजेत ---सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

भारताचे चांगले सुजाण नागरिक बनायचे असेल तर विद्यार्थ्यांनी चांगले वागले पाहिजे, आपल्यावर चांगले संस्कार झाले पाहिजेत आणि विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून दूर राहिले पाहिजे. विद्यार्थ्यांनी खेळामध्ये प्राविण्य मिळवण्यासाठी खेळात सहभागी झाले पाहिजे. विद्यार्थ्यांनी शाळेत येताना जाताना वाहतुकीचे नियम पळून शिस्तीने ये-जा केली पाहिजे.शाळेच्या बाहेर कोणत्याही विद्यार्थ्यांनी हुल्लडबाजी करू नये.बेशिस्त वर्तन करणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष राहणार असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.देशाची सेवा एक पोलीस म्हणून नाही तर एक चांगला नागरिक बनून सुद्धा करता येते. भारताला विकसित देश बनवायचा असेल तर विद्यार्थ्यांची गरज आहे असे मतं अकलूजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे यांनी माळीनगर येथे बोलताना व्यक्त केले.



         निर्भया पथक अकलूज व अकलूज पोलीस स्टेशन यांचे वतीने बुधवारी येथील दि मॉडेल विविधांगी प्रशाला,माळीनगर येथील इयत्ता पाचवी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सहा.पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे

यांनी वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.विद्यार्थ्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या.

      यावेळी निर्भया पथकाच्या पोलीस निरीक्षक करिष्मा वनवे, पोलीस नाईक श्री. नागरगोजे,पोलीस हवालदार विठ्ठल मिसाळ, इन्नूस आतार,शब्बीर नदाफ,प्राचार्य कलाप्पा बिराजदार,उपप्राचार्य रितेश पांढरे, पर्यवेक्षक कल्याण कापरे, शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा