*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी -टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 8378081147
----- देशाचा ७६ वा प्रजासत्ताक दिन नरसिंहपूर परीसरात मोठ्या उत्साहात पण साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, चाॅकलेट, गोळ्या, मिठाई वाटप करण्यात आले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशवाडी येथे निवृत्त पोलीस दशरथ काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी हरीदास घोगरे, बाळासो घोगरे, सुधाकर कांबळे, फणिंद्र कांबळे, अविनाश खंडागळे, अश्विनी खंडागळे, मुख्याध्यापक निर्मला निर्मळ, साधू कांबळे, सुरेखा कुंभार, बशीरा तांबोळी आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी लहान बालकांनी महापूरूषांवर भाषणे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
पिंपरी बुद्रुक येथील आरोग्य उपकेंद्रात पांडुरंग बोडके, उपसरपंच संतोष सुतार, डॉ सुमित्रा कोकाटे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आरोग्य सहाय्यक सुनील सुराडकर, प्रियांका पाटील, आशासेविका रफिया तांबोळी, पुष्पा ठोकळे, सुरेखा क्षीरसागर, रूपाली चव्हाण, अश्विनी देवळे, विद्या देशमुख, मालन जगताप, सारिका वाघमारे, स्वाती पाटील आदी उपस्थित होते. यावेळी तंबाखू मुक्त भारत अभियानाची शपथ घेण्यात आली.
नरसिंहपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सरपंच अर्चना नितीन सरवदे, उपसरपंच पप्पू गोसावी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक देशमुख गुरुजी, संगीता देवळे आदी मान्यवर उपस्थित होते.
नरसिंहपूर येथील चैतन्य विद्यालय व श्री सु.गो.दंडवते कनिष्ठ महाविद्यालयात कार्यवाह श्रीकांत दंडवते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी खजिनदार मगनदास क्षिरसागर, भाग्यश्री दंडवते, धनंजय दुनाखे, गोरख लोखंडे आदि मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओझरे येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहन माजी सैनिक विलास रास्ते व नवनाथ शिंदे यांचे हस्ते करण्यात आले. तसेच सर्वांना तंबाखु मुक्तीची शपथ देण्यात आली. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मुख्याध्यापक विजय पाटील सर यांनी मनोगत व्यक्त केले.
पिंपरी बुद्रुक येथील लोकनेते महादेवराव बोडके दादा विद्यालयात लालासो बोडके यांच्या हस्ते बाळासाहेब मगर यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.
फोटो - पिंपरी बुद्रुक येथील आरोग्य उपकेंद्रात ध्वजारोहण करताना मान्यवर दिसत आहेत.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा