उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
माळशिरस तालुक्यातील गणेशगाव येथील प्रसिद्ध असलेल्या स्वयंभू गणेश मंदिरात गणेश जयंतीनिमीत्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.हा गणपती नवसाला पावणारा म्हणून नवशा गणपती या नावाने गणेशाची ओळख आहे.हजारो भाविक भक्त दर्शनासाठी दर चतुर्थीला या गावात येत असतात.जेमतेम दीड हजार लोकसंख्या असणाऱ्या या छोट्याशा गावात हिंदू-मुस्लिम समाज एकोप्याने एकमेकांचे सण उत्सव साजरे करतात.दरवर्षी गणेश जयंती हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा व्हावा म्हणून सर्व लोक हिरीरीने सहभागी होतात. जातीधर्माच्या पलीकडे जावून माणुसकी हा धर्म प्रत्येक जन पळताना दिसतो.आम्ही गणेशगांवकर अशी ओळख सांगण्यात सर्वच ग्रामस्थांना अभिमान वाटतो.
महाराष्ट्रभरातून येणाऱ्या भाविक भक्तांची कोणतीही गैरसोय होवू नये.यासाठी गावातील सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येवून अतिशय उत्साहाने भव्य दिव्य अशी जयंती साजरी करतात.मागील वर्षी न्य प्रसिद्ध ज्योतिषशास्त्र पंडित अतुल शास्त्री भगरे गुरुजी (झी टॉकीज फ्रेम) यांचे सलग तीन दिवस प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.
यंदा गायनाचार्य ह.भ. प.ज्ञानेश्वरी ताई घाडगे (झी टॉकीज मन मंदिरा फेम) यांचा श्री गणेश जनमोत्सवा निमित्त शनिवार दिनांक १ फेब्रुवारी २०२५ रोजी कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे . ३१ जानेवारी शुक्रवार रोजी सायंकाळी ७ ते १०.श्रींची ग्राम प्रदक्षिणा (छबिना) व शनिवारी गणेश याग व होम हवन होणार आहे.व सायंकाळी ७ पासून पुढे महाप्रसादाचे उत्तम नियोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.तरी या कार्यक्रमाचा लाभ गणेश भक्तांनी घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा