*कोडोली, पन्हाळा --प्रतिनिधी*
*प्रा.विश्वनाथ पाटील*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
कोडोली ( ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर)/ दि. २६: येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालय ( बी. एड्.काॅलेज), कोडोली येथे मराठी संवर्धन पंधरवड्यानिमित्त घोषवाक्य प्रदर्शन भरविण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डाॅ.विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते झाले. मराठी विभागाने हे प्रदर्शन आयोजित केले होते.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत आयोजिलेल्या या प्रदर्शनात विद्यार्थी- शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. उद्घाटन समारंभास महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख प्रा. सदाशिव रक्ताडे, मराठी विभाग प्रमुख प्रा. श्रीमती गुलनास मुजावर उपस्थित होते. या उपक्रमास श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डाॅ. जयंत पाटील , विश्वस्त विनिता पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा