*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री विजय गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट शंकरनगरच्या वतीने सहकार महर्षी केसरी भव्य ओपन बैलगाडा शर्यत स्पर्धेचे ७ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजन करण्यात आले असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले.यावेळी प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील होते.
या स्पर्धे संदर्भात माहिती देताना मोहिते पाटील म्हणाले की,या स्पर्धेतील पहिले पारितोषिक एक लाख पन्नास हजार रूपये व सहकार महर्षी चषक,दुसरे पारितोषिक एक लाख दहा हजार रूपये व चषक,तृतीय पारितोषिक पंच्याहत्तर रूपय व चषक,चौथे पारितोषिक साठ हजार रुपये व चषक,पाचवे पारितोषिक पन्नास हजार रुपये व चषक,सहावे पारितोषिक तीस हजार रूपये व चषक,सातवे पारितोषिक वीस हजार रुपये व चषक,आठवे पारितोषिक दहा हजार रूपये व चषक,सेमी फायनलमध्ये उतरणा-या गाडीस योग्य बक्षीस ठेवण्यात आली आहे.
या स्पर्धे ७ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत चालणार आहे.एका वेळीस दहा बैलगाडा सोडण्यात येणार आहे.एका वेळी दहा बैलगाडा सोडण्यात येणार आहे.प्रथम क्रमांक मिळविणा-या बैलगाडाचा विशेष सन्मान मेडल,झुल व महर्षी चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. आजपर्यंत असा सन्मान कुठे ही बैलांचा सन्मान झालेला नाही आहे.या स्पर्धेत पाच शे बैलगाडा सहभागी होणार आहे.या स्पर्धेची नोंदणी ऑनलाइन ठेवण्यात आली आहे.या स्पर्धेत सहभाग झालेल्या सर्व बैलगाडा यांना सन्मान पत्र देण्यात येणार आहे.या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी एक हजार प्रवेश फी व शंभर रुपये स्वास्थ्य व आरोग्य विषयक प्रमाणपत्र ठेवण्यात आली आहे.या स्पर्धा विजयसिंह मोहिते-पाटील क्रिडा संकुल समोरील पटांगणात पार पडणार आहेत.या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विजयकुमार दुपडे (मो.नं.९९२१५००५९८), अतुल पारसे (मो.नं९१४५५०५९५०), अमित कुंभार (मो.नं.९०९६२७३०८१) संपर्क साधावा.
या स्पर्धेचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे.खासदार धैर्यशील मोहिते-पाटील,आ.रणजितसिंह मोहिते-पाटील,आ.उत्तमराव जानकर,सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा