*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील सततच्या पावसामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होत असून आज दि.20/08/2025 रोजी सकाळी 06.00 वाजता उजनी धरणाच्या सांडव्यावरून पूर नियंत्रणासाठी 75000 क्सूसेक्स व विद्युत गृहातून 1600 क्सूसेक्स असा एकूण 76600 क्सूसेक्स विसर्ग भीमा नदीमध्ये सोडण्यात येत आहे. तसेच, वीर धरण पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान वाढल्याने आज दि.20/08/2025 रोजी सकाळी 06.00 वाजता वीर धरणातून नीरा नदीपात्रात 54760 क्यूसेक्स इतका विसर्ग सुरु आहे.
उजनी धरणातील 76600 व वीर धरणातील 54760 असा एकत्रित 1,31,360 क्सूसेक्स विसर्ग भीमा नदीमध्ये येण्याची शक्यता आहे. घाटमाथ्यावरील पावसाच्या प्रमाणानुसार व धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवक (Inflow) नुसार विसर्गामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे.
त्यानुषंगाने, नदीपात्रालगत पूरस्थिती निर्माण होवून सखल भागातील नागरी वस्तीमध्ये मध्ये पूराचे पाणी शिरण्याची शक्यता आहे. तरी, सुरक्षिततेच्या दृष्टीने नीरा व भीमा नदी काठच्या नागरिकांना आपले स्तरावरून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे
कार्यकारी अभियंता
भीमा पाटबंधारे विभाग
पंढरपूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा